Delhi CM Arvind Kejriwal saam tv
देश विदेश

Arvind Kejriwal News: दिल्ली सरकार तुरुंगातून चालणार! CM अरविंद केजरीवाल यांचा 'ईडी कोठडी'तून पहिला आदेश जारी

Gangappa Pujari

Arvind Kejriwal News:

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना ईडीने अटक केली आहे. अरविंद केजरीवाल यांना अटक केल्यानंतर मुख्यमंत्रीपदाचा कारभार कसा चालणार? असा प्रश्न उपस्थित होत होता. मात्र अरविंद केजरीवाल यांनी तुरूंगातून सरकार चालवणार असल्याचे स्पष्ट केले असून आज त्यांनी कोठडीतून पहिला आदेशही जारी केला आहे.

कथित मद्य घोटाळा प्रकरणात अटक करण्यात आलेले मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी ईडी कोठडीतून पहिला आदेश जारी केला आहे. दिल्ली सरकारच्या जल मंत्रालयाशी संबंधित हा पहिला आदेश अरविंद केजरीवाल यांनी जारी केला आहे. त्यामुळे केजरीवाल सरकार हे दिल्लीमधून चालणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) यांनी एका चिठ्ठीद्वारे जलमंत्र्यांना आपला आदेश जारी केला आहे. याप्रकरणी दिल्ली सरकारमधील जलमंत्री आतिशी रविवारी त्यांच्यासोबत पत्रकार परिषद घेऊ शकतात. तसेच दिल्लीसह देशातील विविध शहरांमध्ये केजरीवाल यांच्या अटकेविरोधात आम आदमी पक्षाचे नेते आणि कार्यकर्त्यांची निदर्शने सुरू आहेत.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

दरम्यान, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना 21 मार्च रोजी तथाकथित दारू धोरण प्रकरणी अंमलबजावणी संचालनालयाने अटक केली होती. ईडीने मुख्यमंत्र्यांना अटक केल्यानंतर दुसऱ्याच दिवशी राऊस ॲव्हेन्यू कोर्टात हजर केले.

त्यानंतर न्यायालयाने त्यांना 28 मार्चपर्यंत ईडी कोठडी सुनावली आहे. तसेच ईडीच्या अटकेविरोधात मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी दाखल केलेल्या याचिकेवर तातडीने सुनावणी करण्यास दिल्ली उच्च न्यायालयाने नकार दिला आहे. (Latest Marathi News)

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Jammu And Kashmir : निवडणूक निकलाआधी दहशतवाद्यांचा डाव उधळला; भारतीय लष्कराने केली शस्त्रे आणि स्फोटके जप्त

Diabetes Control: मधुमेह नियंत्रित ठेवायचाय? 'या' रंगाचे तीळ ठरतील फायदेशीर...

Maharashtra Politics: बच्चू कडूंना 'जोर का झटका', आमदार राजकुमार पटेल शिंदे गटाच्या वाटेवर?

India vs Pakistan: आज जिंकावंच लागेल! पाकिस्तानविरूद्ध 'या' चुका करणं टीम इंडियाला पडणार महागात

Marathi News Live Updates : एसटी बस थांब्यावरून विद्यार्थ्यांचे रस्त्यावर बसून ठीय्या आंदोलन

SCROLL FOR NEXT