Arvind Kejriwal Saam Tv
देश विदेश

Arvind Kejriwal Got Bail: अरविंद केजरीवाल यांना दारू घोटाळा प्रकरणात मोठा दिलासा, न्यायालयाचे जामीन केला मंजूर

Liquor Policy Case: कथित दारू घोटाळ्यात अटक करण्यात आलेल्या अरविंद केजरीवाल यांना कोर्टाने जमीन मंजूर केला आहे.

Satish Kengar

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना जामीन मंजूर झाला आहे. कथित दारू घोटाळ्यात अटक करण्यात आलेल्या केजरीवाल यांना गुरुवारी राऊस एव्हेन्यू कोर्टाने मोठा दिलासा दिला. याआधी सुप्रीम कोर्टाने केजरीवाल यांना 21 दिवसांचा अंतरिम जामीन मंजूर केला होता. 2 जून रोजी आत्मसमर्पण केल्यानंतर ते पुन्हा तिहार तुरुंगात गेले होते. त्यांनी राऊस ॲव्हेन्यू कोर्टात जामिनासाठी अर्ज केला होता. त्यानंतर आज त्यांना दिलासा मिळाला आहे.

ट्रायल कोर्टाचे विशेष न्यायाधीश न्याय बिंदू यांच्या कोर्टाने त्यांना एक लाख रुपयांच्या वैयक्तिक जातमुचलक्यावर जामीन मंजूर केला आहे. या आदेशाला उच्च न्यायालयात आव्हान देता यावे यासाठी जामीनपत्रावर स्वाक्षरी करण्यासाठी ४८ तासांचा अवधी द्यावा, अशी विनंती ईडीने ट्रायल कोर्टाला केली. मात्र या आदेशाला स्थगिती दिली जाणार नसल्याचे न्यायमूर्तींनी स्पष्ट केले आहे.

ट्रायल कोर्टाने सांगितले की, जामीनपत्र उद्या न्यायाधीशांसमोर सादर केला जाईल. केजरीवाल शुक्रवारी तुरुंगातून बाहेर येऊ शकतात. केजरीवाल यांच्या सुटकेआधी ईडी दिल्ली हाय कोर्टात जाऊन ट्रायल कोर्टाच्या आदेशाला स्थगिती मागू शकते, असं बोललं जात आहे. केजरीवाल यांना २१ मार्च रोजी मनी लाँड्रिंग प्रकरणात अटक करण्यात आली होती.

सलग दोन दिवस दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकून घेतल्यानंतर कोर्टाने निर्णय राखून ठेवला होता. अरविंद केजरीवाल यांच्या जामीन अर्जाला विरोध करताना ईडीने गुरुवारी न्यायालयात दावा केला होता की, दारू घोटाळ्यात वापरलेल्या पैशाचे फोटो जप्त करण्यात आले आहे.

केजरीवाल यांनी 100 कोटी रुपयांची लाच मागितल्याचा दावा ईडीने केला होता. तर केजरीवाल यांच्यावतीने उपस्थित असलेल्या वकिलाने म्हटले होते की, संपूर्ण प्रकरण केवळ सरकारी साक्षीदारांच्या जबाबावर आधारित आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Australia vs England, 1st Test : कसोटीत १०४ वर्षांनी चमत्कार, दुसऱ्याच दिवशी तगड्या इंग्लंडचा ऑस्ट्रेलियाकडून सुपडासाफ

Curd in winter: हिवाळ्यात दही खाताना 'या' गोष्टी नक्की लक्षात ठेवा

Maharashtra Live News Update: अमित साटम यांच्या विरोधात काँग्रेस कार्यकर्त्यांचं आंदोलन

शिक्षणासाठी घरातून पळाली अन् रेड लाइट एरियात अडकली; तिथून निसटली, पण शेतात काढावी लागली अख्खी रात्र

Local Body Election: शिर्डीत अपक्ष महिला उमेदवाराला शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्यांकडून मारहाण

SCROLL FOR NEXT