New CCTV Reveals Intensity of Blast Saam
देश विदेश

स्फोटानं मेट्रो स्टेशन हादरलं, प्रवाशांची पळापळ अन्... ; दिल्ली स्फोटाचा आणखी एक धक्कादायक VIDEO समोर

New CCTV Reveals Intensity of Blast: लाल किल्ल्याजवळ मेट्रो गेट १च्या बाहेर आय२० चारचाकीमध्ये भीषण स्फोट झाला. स्फोटाची तीव्रता इतकी होती की मेट्रो स्टेशन हादरून गेले. या घटनेचा आणखी एक सीसीटीव्ही व्हिडिओ समोर.

Bhagyashree Kamble

  • ४० फूट खाली जमीन हादरली

  • लोकांच्या चिंधड्या उडाल्या

  • दिल्ली बॉम्बब्लास्ट VIDEO समोर

दिल्लीच्या लाल किल्ल्याजवळील मेट्रो स्टेशनच्या गेट क्रमांक १ जवळ भीषण स्फोट झाला. हा स्फोट घडल्यानंतर संपूर्ण देशात खळबळ उडाली. या घटनेचा तपास विविध एजन्सींकडून सुरू आहे. या घटनेचे नवनवीन सीसीटीव्ही फुटेज समोर येत आहेत. या व्हिडिओतून स्फोटाची तीव्रता स्पष्ट होते. या स्फोटाची तीव्रता जास्त होती. स्फोटाचा धक्का जमिनीपासून ४० फूट खोल जाणवले. याचा आणखी एक सीसीटीव्ही समोर आला आहे. यातून स्फोटाची तीव्रता दिसून येते.

सीसीटीव्ही फुटेजमध्ये स्पष्टपणे दिसून येते की, स्फोटानंतर लगेचच संपूर्ण भूमिगत स्टेशनचा मजला, दुकानांचे शटर आणि अगदी फूड कॉर्नरच्या शेल्फ्सही जोरदार हादरल्या. लोकांनी घाबरून पळ काढला. तपासकर्त्यांनी सांगितले की, स्फोट दिल्ली मेट्रो लाइनच्या अगदी वर झाला होता. यामुळे रस्ते खराब झाले. याचा थेट फटका मेट्रोच्या पायाभूत सुविधांना बसला असता.

सोमवारी लाल किल्ल्याजवळ पांढऱ्या रंगाची हुंडई आय२० चारचाकीत स्फोट झाला. यात १३ जणांचा मृत्यू झाला. सध्या या प्रकरणाचा अधिक तपास सुरू आहे. तपासात असे दिसून आले की, आरोपींनी आईडीसाठी तीन कार तयार केल्या होत्या. एक पांढऱ्या रंगाची हुंडई आय२०, दुसरी फोर्ड (फरिदाबादमध्ये सापडली), सध्या तिसऱ्या कारचा शोध सुरू आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sunday Horoscope : मनासारखा दिवस जाणार; ५ राशींच्या लोकांसाठी रविवार गेमचेंजर ठरणार

Maharashtra Live News Update: सोलापूर जिल्ह्यातील बारा नगरपालिका नगराध्यक्षपदाची निवडणूक भाजप स्वबळावर लढवणार

ऐन निवडणुकीत कारमध्ये सापडली 1,0000000 रुपयांची रोकड; इतकी रक्कम नेमकी कुणाची?

ऐन निवडणुकीत अजित पवारांना मोठा हादरा; विश्वासू नेत्यानं साथ सोडली, तडकाफडकी राजीनामा

Sunday Horoscope: पैशाची तंगी होणार दूर, ५ राशींची होणार भरभराट, वाचा रविवारचे राशीभविष्य

SCROLL FOR NEXT