देशाची राजधानी दिल्ली स्फोटानं हादरलीय... कारण लाल किल्ला मेट्रो स्टेशन परिसरात कारमध्ये स्फोटकं ठेऊन दिल्लीवर पहिलाच आत्मघातकी हल्ला करण्यात आलाय... या हल्ल्याचं फरिदाबाद कनेक्शन समोर आलंय...कारण सुरक्षा यंत्रणांनी फरिदाबादमध्ये 2 हजार 900 किलो अमोनियम नायट्रेट आणि स्फोटकं जप्त केले... आणि त्यामुळेच डॉ. उमरचे धाबे दणाणले..आणि त्याने इतर दहशतवाद्यांसह हल्ल्याची योजना आखली.... एवढंच नाही तर हल्ल्यानंतर पुरावे नष्ट करण्यासाठी घाबरगुंडी उडालेल्या उमरने i20 कारसह आत्मघातकी स्फोट घडवला.
मात्र देशाच्या आत्म्यावर आत्मघातकी हल्ला करणाऱ्या डॉ. उमरने फरिदाबाद ते दिल्ली प्रवास नेमका कसा केला? पाहूयात...
स्फोटकांनी भरलेल्या कारचा प्रवास
कारचा प्रवास
दुपारी 2 वाजता
बदरपुर बॉर्डरवरून दिल्लीत कारचा प्रवेश
दुपारी 3.19 वाजता
सुनहरी मस्जिद भागात कार पार्किंग
सायं 6.48
कार पार्किगमधून बाहेर काढली
सायं. 6.52
लाल किल्ल्याजवळील मेट्रो स्टेशनबाहेर स्फोट
मात्र सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार जैश ए मोहम्मद आणि लष्कर ए तोयबाच्या दहशतवादी डॉक्टरांनी या हल्ल्याची योजना आधीच बनवली होती... तब्बल 2900 किलो स्फोटकांसह देशात हल्ले करण्याचा कट रचला गेला .....याच स्फोटासाठी मोहम्मद सलमानच्या नावावर असलेली HR 26 7624 ही कार खरेदी केली. या कारच्या चावीवर रॉयल कार झोन या कंपनीचं नाव आहे..
फरीदाबादमधील ही कंपनी
सेकंडहॅंड कार विकण्याचं काम करते... या कंपनीकडून आधी 2015 मध्ये तारीकने कार खरेदी केली..तारीकने ही कार उमरला दिली... तर पुढे ही कार देवेंद्र नावाच्या व्यक्तीला विकण्यात आली... आणि हिच कार स्फोटासाठी वापरण्यात आलीय...मात्र राजधानी दिल्लीत पहिल्यांदाच आत्मघातकी स्फोट घडवलाय.. या हल्ल्यासाठी हजारो किलो स्फोटकं देशाच्या राजधानीत आणल्यानं हे सुरक्षा यंत्रणांचं अपयशच आहे.. त्यामुळे सरकारने दहशतवाद्यांच्या नांग्या ठेचण्यासोबतच पोकळ सुरक्षा यंत्रणाही मजबूत करण्याकडे लक्ष द्यायला हवं..
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.