महाराष्ट्रात मोठा विजय मिळवल्यानंतर अजित पवार गट आता दिल्ली जिंकण्याची तयारी करत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असून त्यांनी उमेदवारांची यादी जाहीर केलीय. अजित पवार गटाने ११ जागांवरील उमेदवारांची यादी जाहीर केलीय. पण येथे अजित पवार गट स्वबळावर निवडणूक लढवत आहे. म्हणजेच काय महाराष्ट्रात भाजपसोबत महायुतीतून निवडणुकीला सामोरे जाणाऱ्या अजित दादांनी दिल्लीसाठी वेगळी चूल मांडलीय.
राष्ट्रवादीच्या संसदीय बोर्डाने मुंजरी दिल्यानंतर पहिल्या टप्प्यात ११ उमेदवारांचे नावे जाहीर केली आहेत. राष्ट्रवादी बुराडी, बादली, मंगोलपुरी, चांदनी चौक, बल्ली मारन, छतरपूर, संगम विहार, ओखला, लक्ष्मीनगर , सीमा पुरी, आणि गोकूळ पुरी, येथील जागांवर उमेदवारी उतरवले आहेत. येथील उमेदवारांच्या नावांची यादी पक्षाकडून जाहीर करण्यात आलीय.
बुरारी येथून - रतन त्यागी
बदली- मुलायम सिंह
मंगलोपुरी - खेमचंद
चांदनी चौक - खलिदुर रहमान
बल्लीमारन- मोहम्मद हारून
छतरपूर- नरेंद्र तन्वर
संगम विहार - कमर अहमद
ओखला - इम्रान सैफी
लक्ष्मीनगर- नमा
सीमापुरी- राजेश लोहिया
गोकुळपुरी- जगदीश भगत
दिल्ली विधानसभा निवडणुकीसंदर्भात राष्ट्रवादी नेते प्रफुल्ल पटेल म्हणाले, राष्ट्रवादी काँग्रेस आधीही दिल्ली विधानसभा निवडणूक लढवत होती. आताही ही निवडणूक लढवणार आहे. दरम्यान भाजपसोबत युती करायची का नाही याबाबत चर्चा केली जाईल. परंतु उमेदवारांची यादी जाहीर केल्यामुळे राष्ट्रवादी दिल्लीच्या निवडणुकीत स्वबळावर उतरणार असल्याचं म्हटलं जात आहे. दिल्लीत एकूण ७० विधानसभा जागा आहेत.
यात आम आदमी पक्षाने सर्व ७० विधानसभा जागांसाठी आपले उमेदवार जाहीर केलेत. तर काँग्रेसने ४७ उमेदवारांची यादी जाहीर केलीय. तर बाकी उमेदवारांची नावे अद्याप जाहीर केली नाहीत. दुसऱ्या बाजुला एआयएमआयएमने दिल्ली दंगलीतील आरोपी ताहिर हुसेनला मुस्तफाबादमधून उमेदवारी दिलीय. तसेच दिल्ली दंगलीतील आरोपी शाहरुख पठाणला सीलमपूरमधून उमेदवारी दिली जाण्याची शक्यता आहे. आज राष्ट्रवादी काँग्रेसने दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी ११ उमेदवारांची पहिली यादी जाहीर केलीय.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.