ED RAID ON AAP LEADER DEEPAK SING IN DELHI SPARKS POLITICAL ROW Saam tv
देश विदेश

Political News : मोठी बातमी! दिल्लीत बड्या नेत्याच्या घरावर ED ची धाड, राजकारणात खळबळ

Delhi AAP Leader Deepak Singh News : दिल्लीत ईडीने ‘आप’ नेते दीपक सिंग यांच्या घरावर छापा टाकत मनी लॉन्ड्रिंग प्रकरणाच्या तपासाला वेग दिला आहे. गोव्यातही एकाच वेळी कारवाई सुरू असून, यामुळे राजकीय वातावरण तापले आहे.

Alisha Khedekar

  • ED कडून दिल्लीत छापेमारी

  • ‘आप’ नेते दीपक सिंग यांच्या घरी तपासाची कारवाई

  • दिल्लीसोबत गोव्यातही एकाच वेळी धाड

  • आम आदमी पार्टी कडून कारवाईवर तीव्र प्रतिक्रिया

दिल्लीमध्ये ईडीने पुन्हा एकदा छापेमारीची कारवाई केली आहे. सोमवारी सकाळी ईडीच्या पथकांनी आम आदमी पक्षाचे (आप) नेते दीपक सिंगला आणि इतर काही संबंधित व्यक्तींच्या घरांवर धाड टाकली. कथित बँक कर्ज घोटाळ्याशी संबंधित मनी लाँड्रिंग प्रकरणाच्या तपासाअंतर्गत ही कारवाई करण्यात आल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. दिल्लीसह गोव्यातही एकाच वेळी छापेमारी सुरू असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे आता कोणते नवीन मासे गळाला लागतात हे पाहणे महत्त्वाचं ठरेल.

मिळालेल्या माहितीनुसार, दीपक सिंग हे दिल्लीतील विश्वास नगर मतदारसंघातून आम आदमी पक्षाचे उमेदवार राहिले आहेत. पक्षात ते महत्त्वाची जबाबदारी सांभाळत असून, एमसीडीचे सह-प्रभारी तसेच महाराष्ट्र आणि गोवा राज्यांचे प्रभारी म्हणून ते कार्यरत आहेत. सोमवारी सकाळी सुमारे ६ वाजण्याच्या सुमारास ईडीची टीम त्यांच्या घरी पोहोचली आणि तपासाची प्रक्रिया सुरू केली. याआधीही २००४ साली त्यांच्या निवासस्थानी ईडीने छापा टाकल्याची नोंद आहे.

गेल्या काही काळात ईडीने आम आदमी पक्षाच्या विविध नेत्यांवर कारवाईचा धडाका लावला आहे. पंजाबमध्येही ‘आप’च्या काही प्रमुख नेत्यांच्या घरी छापेमारी झाली होती. भगवंत मान सरकारमधील मंत्री संजीव अरोरा यांनाही अटक करण्यात आली होती. त्यामुळे या कारवाईमुळे पुन्हा एकदा राजकीय वातावरण तापले आहे.

दरम्यान, या छापेमारीवर आम आदमी पक्षाने तीव्र प्रतिक्रिया दिली आहे. पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि दिल्लीचे माजी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांनी केंद्र सरकारवर निशाणा साधला. त्यांनी आरोप केला की, “मोदीजी ईडी, सीबीआय आणि निवडणूक आयोग यांचा वापर करून विरोधी नेत्यांना निवडणुका जिंकण्यापासून रोखू शकतात, मात्र देशाची अर्थव्यवस्था आणि रुपयाचे घसरते मूल्य थांबवण्यात ते अपयशी ठरत आहेत,” असे सिसोदिया यांनी म्हटले. या संपूर्ण प्रकरणामुळे राजकीय वर्तुळात आरोप-प्रत्यारोपांची मालिका सुरू झाली असून, येत्या काळात या तपासातून आणखी काय उघड होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: प्रवीण गोयल आणि आई पूजा गोयल यांची १२ तास चौकशी

Ratnagiri Tourism : कोकणातील खास आकर्षण; पावसाळ्यात आवर्जून फिरा रत्नागिरीतील 'हे' २ समुद्रकिनारे

गुगलवर हत्येचे पर्याय शोधले, लोहगडवरून ढकलण्याचा सराव केला; केतन अग्रवाल खून प्रकरणाचा थरारक उलगडा

TET Exam Update : आज होणारी TET परीक्षा पुढे ढकलली, दिल्ली कनेक्शन आणि दीड कोटींचा व्यवहार; मोठी अपडेट समोर

भयंकर! ७ वर्षांची मुलगी शेजारी झोपलेली असतानाच पत्नीचा गळा चिरून खून; नंतर पतीने मेट्रोसमोर उडी मारून संपवलं आयुष्य

SCROLL FOR NEXT