Dehradun Accident : देहरादूनच्या ओएनजीसी चौकाजवळ भीषण अपघातात ६ जणांचा मृत्यू झाला. कारचा अक्षरशः चेंदामेंदा झाला. (PTI) पीटीआय
देश विदेश

Dehradun Accident News : ३ मैत्रिणींसह ७ जण फिरायला निघाले होते, ६ जणांना मृत्यूनं गाठलं; कार उभी चिरली, VIDEO

Major Accident in Dehradun : देहरादूनमध्ये सोमवारी रात्री भीषण अपघात झाला. या अपघातात सहा मित्रांचा मृत्यू झाला.

Nandkumar Joshi

उत्तराखंडची राजधानी देहारादूनमधील कँट परिसरात सोमवारी रात्री उशिरा भीषण अपघात झाला. या दुर्घटनेत सहा मित्रांचा दुर्दैवी मृत्यू झाला. तर एक तरूण गंभीर जखमी झाला आहे. ओएनजीसी चौकाजवळ हा अपघात झाला.

भरधाव कार आधी एका कंटेनरला आणि नंतर एका झाडावर जाऊन आदळली. हा अपघात इतका भीषण होता की, कारमधील सहा मित्रांचा जागीच मृत्यू झाला. तर एक गंभीररित्या जखमी झाला आहे. अपघातात कारचा चक्काचूर झाला आहे.

भीषण अपघाताचा व्हिडिओ

कँट परिसरातील ओएनजीसी चौकाजवळ रात्री उशिरा मोठी दुर्घटना घडली. कार आधी एका कंटेनरला धडकली. त्यानंतर ती रस्त्यानजीकच्या झाडावर आदळली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भरधाव कार किशननगर चौकाकडून आली होती. ओएनजीसी चौकाजवळ कारचं नियंत्रण सुटलं. भरधाव कारने एका कंटेरनला जोरदार धडक दिली.

तीन तरूणींसह सहा जणांनी गमावला जीव

या अपघातात तीन तरूणी आणि तीन तरूणांचा समावेश आहे. गुनीत (वय १९), कुणाल (२३ वर्षे), नव्या (२३ वर्षे), अतुल (२४ वर्षे), कामाक्षी (२० वर्षे), ऋषभ जैन (२४ वर्षे) अशी मृतांची नावे आहेत.

जखमी तरुणाची प्रकृती चिंताजनक

या अपघातात सिद्धेश अग्रवाल हा २५ वर्षीय तरुण गंभीर जखमी झाला आहे. त्याची प्रकृती अत्यंत चिंताजनक असल्याचे सांगण्यात येत आहे. तो राजपूर रोड येथील रहिवासी आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, कार किशननगर चौकाकडून ओएनजीसी चौकाच्या दिशेने जात होती.

भरधाव असलेली कार ही एका कंटेनरला धडकली. कारचा बोनट हा कंटेनरमध्ये अडकला. त्यानंतर जवळपास १०० मीटरवर असलेल्या एका झाडावर जाऊन ती कार अडकली.

परिसरावर शोककळा

या भीषण आणि भयावह घटनेत सहा जणांचा मृत्यू झाल्यानं परिसरावर शोककळा पसरली आहे. घटनेनंतर पोलीस तिथे पोहोचले. त्यांनी पाहणी केली. कंटेनर जप्त केला आहे. अपघाताच्या कारणांचा शोध घेतला जात आहे.

घटनास्थळी पोहोचलेल्या पोलिसांनी अपघातग्रस्त कारमधील मृतदेह विच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवले आहेत. पाच जणांचे मृतदेह हे दून रुग्णालयात तर, एकाचा मृतदेह महंत इंद्रेश रुग्णालयात पाठवण्यात आला आहे. अपघातात मृत्युमुखी पडलेले काही जण हे विद्यार्थी असून, ते दिल्ली आणि हिमाचल प्रदेशातील आहेत.

फिरायला निघाले होते, मृत्यूनं गाठलं

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हे सर्व सात मित्र फिरायला निघाले होते. त्याचवेळी ही दुर्घटना घडली. अतिवेग आणि बेदरकारपणे वाहने चालवल्याने असे अपघात होत असतात. या अपघातानंतर पोलिसांनी रस्ते सुरक्षा आणि वाहतूक नियम पाळण्याचे आवाहन तेथील नागरिकांना केले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: कोणत्याही प्रकारची गुंडागर्दीत नको पारदर्शक कारभार करणारी नगरपालिका हवी - देवेंद्र फडणवीस

Syed Mushtaq Ali Trophy: ऐन सामन्यात यशस्वी जैस्वालची तब्येत अचानक बिघडली, पिंपरी-चिंचवडमधील रुग्णालयात दाखल

डोंबिवली स्कायवॉकवर फेरीवाल्यांचा अतिक्रमणाचा विळखा; रेल्वे प्रवाशांची वाट काढताना दमछाक

Thursday Horoscope : अचानक धनलाभ होईल, कुटुंबातील सदस्य खूश होतील; ५ राशींच्या लोकांच्या मनासारख्या घटना घडतील

IND vs SA 4th T20I: भारतविरुद्ध दक्षिण आफ्रिकेच्या सामन्यात धुक्याचा खोडा; चौथा टी२० सामना रद्द

SCROLL FOR NEXT