Rahul Gandhi statement saam tv
देश विदेश

Rahul Gandhi: राहुल गांधींना घरात घुसून गोळ्या घालू, भाजपच्या पदाधिकाऱ्याकडून धमकी; VIDEO ने उडाली खळबळ

Death Threat to Rahul Gandhi: काँग्रेस नेते राहुल गांधी यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली. राहुल गांधी यांच्यासह २५ काँग्रेस खासदारांना घरात घुसून गोळ्या घालू अशी धमकी भाजपच्या पदाधिकाऱ्याने दिली. या धमकीचा व्हिडीओ व्हायरल होत आहे.

Priya More

Summary -

  • राहुल गांधी आणि २५ काँग्रेस खासदारांना जीवे मारण्याची धमकी

  • घरात घुसून गोळ्या घालू अशी धमकी देण्यात आली

  • भाजप आणि करणीसेनेच्या पदाधिकाऱ्याने दिली धमकी

  • धमकी देणारा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे

काँग्रेसचे नेते आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. भाजप आणि करणीसेनेच्या एका पदाधिकाऱ्याने सोशल मीडियावर व्हिडीओ पोस्ट करत राहुल गांधी यांना जीवे मारण्याची धमकी दिली. 'राहुल गांधी यांना घरात घुसून गोळ्या घालू', अशी धमकी देण्यात आली आहे. राहुल गांधी यांच्यासह काँग्रेसच्या २५ खासदारांना देखील त्याने धमकी देण्यात आली आहे. या व्हिडीओमुळे सोशल मीडियावर खळबळ उडाली असून राजकीय वातावरण तापले आहे.

काँग्रेस नेते पवन खेरा यांनी आपल्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर हा व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये भाजपचा पदाधिकारी राहुल गांधी यांच्यासह २५ खासदारांना गोळ्या घालण्याची धमकी देताना दिसत आहे. या व्हिडीओमुळे काँग्रेस नेत्यांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. युवा काँग्रेसने सोशल मीडियावर हा व्हिडीओ शेअर करत कॅप्शनमध्ये लिहिले की, धमकी देणाऱ्या व्यक्तीला अद्याप अटक करण्यात आली नाही. तसंच त्याच्याविरोधात गुन्हा दाखल झालेला नाही.'

भाजपचा पदाधिकाऱ्याने राहुल गांधी यांना धमकी देताना या व्हिडीओत सांगितले की, 'ज्या प्रकारे भारताच्या संसदेमध्ये घुसून काँग्रेसच्या २५ खासदारांनी ओम बिर्ला यांना शिवीगाळ केला. या घटनेचा आम्ही भाजप आणि करणीसेनेचे कार्यकर्ते निषेध करतो. राहुल गांधी यांच्या सांगण्यावरून हे केले गेले. राहुल गांधींनी नीट ऐकावे, पुन्हा अशी घटना घडली तर घरात घुसून गोळ्या घालून मारू आणि याला प्रशासन जबाबदार असेल. काँग्रेसच्या २५ खासदारांवर कारवाई झाली पाहिजे. मोदी सरकारचे मंत्री किरेन रिजिजू यांचे विधान ऐकल्यापासून आम्ही खूप रागात आहोत. जर २४ तासांमध्ये त्या २५ खासदारांना अटक होत असेल तर ठिक आहे. नाही तर प्रत्येकाला घरात घुसून आम्ही गोळ्या घालू. मला जेल झाली तरी चालेल मला काहीच प्रॉब्लेम नाही.'

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पवन खेरा यांनी ट्विटरवर हा व्हिडिओ शेअर करत लिहिले की, 'संपूर्ण आरएसएस-भाजप यंत्रणा गोडसे फॅक्ट्री आहे. राहुल गांधी आणि २५ खासदारांना करणीसेनेने दिलेली धमकी ही एक वेगळी घटना नाही तर ती एक सुनियोजित कटाचा भाग असल्याचे दिसून येत आहे. सुरुवातीला किरण रिजिजू यांनी दावा केला की काँग्रेस खासदारांनी लोकसभेत सभापती ओम बिर्ला यांचा अपमान केला. पण व्हिडिओमध्ये असे काहीही दिसत नाही. त्याऐवजी सभापती हसताना दिसत आहेत. त्यानंतर अनेक भाजप नेत्यांनी तोच शब्द पुन्हा सांगण्यास सुरुवात केली की राहुल गांधी राष्ट्रीय सुरक्षेसाठी धोका आहेत.'

काँग्रेस नेते पवन खेडा यांनी पुढे असे देखील सांगितले की, 'हे सर्व विरोधकांना बदनाम करण्याचा आणि विशेषतः राहुल गांधींविरुद्ध वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न असल्याचे दिसते. धर्मांध राजकारण अशा प्रकारे चालते. आधी खोटे पसरवायचे आणि नंतर ते पुन्हा पुन्हा सांगून लोकांमध्ये राग आणि द्वेष निर्माण करणे. गोडसेची निर्मिती भूतकाळात असे वातावरण निर्माण करण्यासाठी झाली होती आणि आता पुन्हा असेच वातावरण निर्माण केले जात आहे.'

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sonali Bendre: अभिनेत्री सोनाली बेंद्रे आणि तिचा नवरा अडचणीत; मावळच्या शेतकऱ्याने खेचलं कोर्टात, नेमकं प्रकरण काय?

Maharashtra Live News Update : अशोक खरात प्रकरणी थोड्याच वेळात नाशिक न्यायालयात सुनावणी

Maharashtra Politics: २५-३० आमदारांसह राष्ट्रवादी भाजपमध्ये विलीन होणार; राऊतांच्या दाव्यानं राजकीय वर्तुळात खळबळ

Gold Rate Today: खुशखबर! सोनं झालं स्वस्त; १० तोळ्यामागे १५,३०० रुपयांची घसरण; वाचा २२ अन् २४ कॅरेटचे दर

Kapil Sharma: २० वर्षांच्या कारियरमध्ये केले फक्त ४ चित्रपट, एक हिट तीन फ्लॉप, तरीही आहे कोट्यवधींचा मालक

SCROLL FOR NEXT