Uttar Pradesh Crime News Saam Tv
देश विदेश

Uttar Pradesh Crime News: घरात आढळले पाच जणांचे मृतदेह, पतीने पत्नी आणि ३ मुलांची हत्या करून केली आत्महत्या

Priya More

Jaunpur News: उत्तर प्रदेशमध्ये (Uttar Pradesh) एकाच कुटुंबातील पाच जणांचे मृतदेह घरामध्ये आढळल्यामुळे खळबळ उडाली आहे. उत्तर प्रदेशच्या जौनपूरमध्ये ही घटना घडली आहे. पतीने आधी पत्नी आणि तीन मुलांची हत्या केली त्यानंतर त्याने स्वत: गळफास लावून आत्महत्या केली. या घटनेमुळे उत्तर प्रदेश हादरले आहे. पतीने हे टोकाचे पाऊल का उचलले या मागचे कारण समोर आले नाही. उत्तर प्रदेश पोलीस (Uttar Pradesh Police) या धक्कादायक प्रकरणाचा तपास करत आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार. जौनपूरच्या मडियाहुन पोलीस स्टेशन हद्दीतील जयरामपूर गावामध्ये ही काळीज पिळवटून टाकणारी घटना घडली आहे. बुधवारी पहाटे एकाच कुटुंबातील पाच जणांचे मृतदेह घरामध्ये आढळून आले. पतीने पत्नीला बेदम मारहाण करत तिची हत्या केली. त्यानंतर त्याने तीन मुलांची गळा दाबून हत्या केल्याचे सांगितले जात आहे. यानंतर या व्यक्तीने स्वतःही आत्महत्या केली. सकाळी घराचा दरवाजा उघडत नसल्यामुळे शेजारी राहणाऱ्यांनी पोलिसांना माहिती दिली. त्यावेळी हे धक्कदायक प्रकरण समोर आले. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवले आहेत.

जयरामपूर गावात राहणारे नागेश विश्वकर्माचे (37 वर्षे) पत्नीसोबत काही कारणावरून भांडण झाले. या वादानंतर त्याने पत्नी राधिकाला बेदम मारहाण केली. आरोपी ऐवढ्यावरच थांबला नाही. त्याने आपल्या तीन निष्पाप मुलांनाही सोडले नाही. पत्नीची हत्या केल्यानंतर त्याने मोठी मुलगी निकिता (11 वर्षे), मुलगा आदर्श (8 वर्षे) आणि मुलगी आयुषी (3 वर्षे) यांची गळा दाबून हत्या केली. त्यानंतर आरोपीने गळफास लावून आत्महत्या केली.

बुधवारी सकाळी 10 वाजेपर्यंत नागेशच्या घराचा दरवाजा उघडला नाही. त्यामुळे त्याच्या शेजारी राहणाऱ्या सोनू विश्वकर्मा या चुलत भावाने पोलिसांना याची माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत घराचा दरवाजा तोडून आतमध्ये प्रवेश केला. तर पोलिसांना घरातील एकाच बेडवर तीन मुलांचे मृतदेह आढळून आले. पत्नी राधिकाचा मृतदेहही शेजारीच कॉटवर आढळून आला. राधिकाच्या डोक्यावर जखमांच्या खुणा होत्या. तर कपड्याच्या सहाय्याने मुलांचा गळा आवळला होता.

फॉरेन्सिक टीमने घटनास्थळी धाव घेत तपास सुरु केला आहे. नागेशने पत्नी आणि मुलांची हत्या करुन आत्महत्या का केली या मागचे कारण अद्याप समोर आले नाही. पोलीस या प्रकरणी गुन्हा दाखल करत तपास सुरु केला आहे. पाचही जणांचे मृतदेह पोलिसांनी शिवविच्छेदनासाठी रुग्णालयामध्ये पाठवले आहेत. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे. गावावर शोककळा पसरली आहे. नागेशने हे टोकाचे पाऊल का उचलले यामागचे कारण अद्याप अस्पष्ट आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Updates: राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षातील वाद चव्हाट्यावर

Kili Paul Dance : किली पॉलने भोजपुरी गाण्यावर धरला ठेका, 'लॉलीपाप लागेलू'वर जबरदस्त डान्स; हुकस्टेपने वेधलं लक्ष

Shahajibapu Patil : उद्धव ठाकरे कधीच मुख्यमंत्री होणार नाहीत; काळ्या दगडावरची पांढरी रेघ, ५० खोक्यांवरून शहाजीबापू खवळले

Mrunal Thakur: मृणाल ठाकूरविषयी माहित नसलेल्या गोष्टी

Navratri Special Dish: नवरात्रीसाठी रोज काय बनवायचं हा प्रश्न पडलाय का?

SCROLL FOR NEXT