Dalai Lama Viral Video Saam Tv
देश विदेश

Dalai Lama Viral Video: दलाई लामा यांनी लहान मुलाच्या ओठावर चुंबन केल्याने नेटकरी भडकले; व्हिडिओ व्हायरल, काय आहे प्रकरण?

Dalai Lama : आधी ओठावर चुंबन, मग…; दलाई लामा पुन्हा वादात; व्हिडिओ व्हायरल

Shivani Tichkule

Dalai Lama News : दलाई लामा यांचा एक वादग्रस्त व्हिडिओ व्हायरल झाला आहे. या व्हिडिओमध्ये तो एका अल्पवयीन मुलाच्या ओठांवर चुंबन घेत आहे. यानंतर तो या मुलाला त्याची जीभ चोखण्यास सांगतो. या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओवर नेटकऱ्यांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे.  (Latest Marathi News)

हा व्हिडिओ समोर येताच यावरून वाद सुरू झाला आहे. याबाबत सोशल मीडियावर लोक जोरदार टीका करत आहेत. ट्विटरवर (Twitter) या व्हिडिओवर यूजर्स संतप्त प्रतिक्रिया देत आहेत. व्हायरल फुटेजमध्ये दिसत असल्याप्रमाणे हा प्रकार घडत असताना इतर लोक जे टाळ्या वाजवत, हसत होते हे अत्यंत घृणास्पद आहे.

दलाई लामा एका कार्यक्रमात उपस्थित होते. एक मुलगा दलाई लामा यांचं स्वागत करण्यासाठी पुढे आला असता दलाई लामा यांनी मुलाला जवळ घेतलं. त्यानंतर त्याचं चुंबन घेतलं आणि जीभ माझी जीभ चोख असं म्हटलं. या घटनेच्या व्हिडीओ (Video Viral) समोर येताच दलाई लामा यांच्यावर सर्व स्तरातून टीका केली जात आहे.

दरम्यान , अशा प्रकारे दलाई लामा वादात अडकण्याची ही पहिलीच वेळ नाही. याआधी २०१९ मध्ये दलाई लामा यांनी “जर एखादी महिला दलाई लामा आली तर ती अधिक आकर्षक असली पाहिजे,” असे एका ब्रिटिश ब्रॉडकास्टरला दिलेल्या मुलाखतीत सांगितले होते, जे त्यांच्या धर्मशाळा येथील निर्वासनातून प्रसारित झाले होते. मात्र, त्यानंतर त्यांनी आपल्या वादग्रस्त वक्तव्याबद्दल माफी मागितली होती.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Kidney problems: हे 1 साधं लक्षण दिसलं तर समजा लवकरच किडनी होणारे खराब, हळूहळू पोखरतं शरीर

Maharashtra News Live Update:नवीन पाणीपुरवठा योजनेत मनपावर ३०० कोटींचा अतिरिक्त भार; टप्पे कमी करण्याचे नियोजन

Petrol-Diesel Price Hike: CNG आणि LPG महागले! मग पेट्रोल-डीझेल स्वस्त की महाग? आजचे नवीन दर जारी, पाहा तुमच्या शहरातील भाव

India : भगवान शंकराचं अनोखं मंदिर! जेथे शिवलिंगावर अखंड पडत राहतं गंगाजल, जाणून घ्या कुठे आहे लोकेशन

Besan vs Milk for Face: चेहऱ्यासाठी बेसन की दूध, काय लावणे अधिक फायदेशीर आहे?

SCROLL FOR NEXT