Rain Saam TV
देश विदेश

IMD Rainfall Alert: मिचौंग चक्रीवादळाचा धोका, राज्यात पुन्हा अवकाळी पाऊस कोसळणार; या जिल्ह्यांना झोडपणार

Maharashtra Rain Alert: चक्रीवादळाचा वेग ताशी १०० किलोमीटरपर्यंत असल्याने महाराष्ट्रासह अनेक राज्यांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

Satish Daud

Cyclone Michoung IMD Rain Alert

बंगालच्या उपसागरात मिचौंग चक्रीवादळ तयार झालं आहे. उद्या म्हणजे ५ डिसेंबर रोजी हे चक्रीवादळ आंध्र प्रदेशातील नेल्लोर आणि मछलीपट्टणमदरम्यान धडकण्याची शक्यता आहे. चक्रीवादळाचा वेग ताशी १०० किलोमीटरपर्यंत असल्याने महाराष्ट्रासह अनेक राज्यांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.  ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

हवामान खात्याच्या अंदाजानुसार, मिचौंग चक्रीवादळाचा महाराष्ट्राला कोणताही धोका नाही. मात्र, चक्रीवादळात मोठ्या प्रमाणावर बाष्प असल्याने पुढील ३ ते ४ दिवसात मराठवाडा, विदर्भ, पश्चिम महाराष्ट्रातील काही भागात पुन्हा अवकाळी पावसाची (Heavy Rain) शक्यता आहे.

मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, लातूर, नांदेड, हिंगोली जिल्ह्यात, तर विदर्भातील अमरावती, नागपूर, वर्धा आणि वाशिम जिल्ह्यांत हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होण्याचा अंदाज आहे. याशिवाय काही ठिकाणी मेघगर्जनेसह जोरदार पाऊसही (Rain Alert) पडेल, अशी शक्यता वर्तविण्यात आली आहे.

मिचौंग चक्रीवादळामुळे केंद्र आणि राज्य सरकार सतर्क झाले आहेत. तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन यांनी राज्यातील १२ जिल्हा प्रशासनसोबत बैठक घेत खबरदारीच्या उपाययोजना करण्याचे आदेश दिले आहेत. केंद्रीय सचिव राजीव गौबा यांनी बैठक घेत आढावा घेतला आहे.

मिचौंग चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर तामिळनाडू किनारपट्टी आणि आंध्र प्रदेशात भारतीय हवामान विभागाने ‘ऑरेंज’ अलर्ट जारी केला आहे. IMD कडून तामिळनाडूमधील उत्तर किनारपट्टी, पुद्दुचेरी आणि कराईकल येथे अती मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे.दक्षिण आणि पूर्व भारतातील अनेक भागांत मुसळधार पावसाचा अंदाज आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Vice President Election: सी.पी. राधाकृष्णन कोण आहेत? जाणून घ्या राधाकृष्णन यांचा राजकीय प्रवास

Amol Kolhe :...म्हणून लोकांच्या मनात संभ्रम निर्माण होतोय; खासदार अमोल कोल्हेंचा भाजपवर जोरदार प्रहार

Jalna Accident: ट्रकच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर; भीषण अपघातात ३ जणांचा जागीच मृत्यू

Voter Fraud : खोपोलीतही मतदार याद्यांमध्ये घोळ, 140 मतदारांची नावं यादीत दोन वेळा

Makeup Side Effects: दररोज मेकअप केल्याने चेहऱ्यावर काय परिणाम होतो?

SCROLL FOR NEXT