Cyclone Updates, Cyclone Name Saam tv
देश विदेश

Cyclone Name: चक्रीवादळाला 'मंदोस' नाव कसं पडलं? कोण ठरवतं वादळांची भन्नाट नावे? कोणत्या देशांकडे असते जबाबदारी? जाणून घ्या

मंदोस चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर खबरदारी म्हणून राज्यातील प्रशासनाने आधीपासूनच सतर्कता बाळगली आहे.

साम टिव्ही ब्युरो

Cyclone Mandous News : मंदोस चक्रिवादळाच्या रुपाने सध्या पाँडेचरीमधील कराईकल आणि आंध्रप्रदेशमधील श्रीहरीकोटा भागात धोक्याचा इशारा दिला आहे. या भागातून मंदोस चक्रिवादळ धडकणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. यासाठी खबरदारी म्हणून राज्यातील प्रशासनाने आधीपासूनच सतर्कता बाळगली आहे.

याचाच भाग म्हणून तामिळनाडू सरकारने शुक्रवारी चेन्नई, कुड्डालोर, विल्लुपुरम, कांचीपुरम, तिरुवल्लूर आणि वल्लोर जिल्ह्यांतील शाळा तसेच महाविद्यालये बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच आंध्रप्रदेशचे मुख्यमंत्री वायएस जगनमोहन रेड्डी यांनी मंडूस वादळाचा धोका लक्षात घेत दक्षिण भागातील जिल्हाधिकाऱ्यांना सतर्क राहण्याचे आदेश दिले आहेत. (Latest Marathi News)

मुख्यमंत्री जगनमोहन रेड्डी यांनी मंदोस वादळाच्या (Cyclone) पार्श्वभूमीवर नेल्लोर, तिरुपति, चित्तूरसह आंध्रप्रदेशातील दक्षिण आंध्रप्रदेशातील जिल्हाधिकाऱ्यांसोबत एक बैठक घेतली. या बैठकीत कृषीअधिकाऱ्यांना शेतकऱ्यांना घेण्याच्या खबरदारीबद्दल जागरुक करण्याचे आदेश दिले आहेत. भारतीय हवामान शास्त्र विभागाने दिलेल्या सुचनेनुसार मंदोस चक्रिवादळ गुरूवारीरात्रीपर्यंत उग्ररुप धारण करण्याची शक्यता वर्तवली आहे.

चक्रिवादळ म्हणजे काय?

समुद्री मार्गाने तयार होणाऱ्या वादळांना चक्रिवादळ असे म्हणतात. चक्रिवादळ तयार झाल्यानंतर या भागात मुसळदार पाऊस तसेच जोराचा वारा वाहत असतो. या वादळाच्या प्रचंड वेगाने आणि उग्ररुपामुळे अनेकदा जिवीतहानी किंवा भौतिक मालमत्तेचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होण्याची शक्यता असते. कमी दाबाच्या पटट्यात विविध मार्गांनी आणि वेगाने वाहणाऱ्या वाऱ्यांमुळे चक्रिवादळ तयार होत असते.

चक्रिवादळांचे नाव कसे ठरवतात?

आत्तापर्यंत तोक्ते, अम्फांन, निसर्ग, गती अशी अनेक चक्रिवादळे देशात धडकली आहेत. या वादळांइतकीच त्यांच्या नावांचीही प्रचंड चर्चा होत असते. या वादळांची नावे ही प्रादेशिक विशिष्ठ हवामान केंद्रे तसेच (Regional Specialised Metrological Centres, RSMC) और उष्णकटिबंधीय चक्रिवादळ चेतावनी केंद्राद्वारे(Tropical Cyclone Warning Centres, TCWC) केले जाते.

या चक्रिवादळांची नावे ठेवण्याच्या १३ सदस्यीय देशांमध्ये भारत, बांग्लादेश, मालदीव, पाकिस्तान, कतार, श्रीलंका, थायलंड, संयुक्त अरब अमीरात, यमन, ओमान, सौदी अरेबिया, म्यानमार आणि इराणचा समावेश आहे. संयुक्त अरब अमिरातने सध्याच्या मंदोस चक्रिवादळाचे नामकरण केले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Rain Live News : तीन दिवसानंतर मुंबईत आता पावसाची विश्रांती

Madison Square Garden: न्यूयॉर्कमधील मॅडिसन स्क्वेअर 'भारत माता की जय' आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयघोषाने दुमदुमलं

Nandurbar : बस कंडक्टरकडून विद्यार्थिनींना शिवीगाळ; नंदुरबार बसस्थानकावरील प्रकार, कारवाईची मागणी

Beed : सरकारी वकिलाने कोर्टातच केली आत्महत्या, बीडमध्ये खळबळ

Diabetic patients: पांढरा भात खाल्ल्याने शरीरातील ब्लड शुगरचं काय होतं? मधुमेही रूग्णांनी भात खावा की नाही?

SCROLL FOR NEXT