Cyclone In West Bengal Yandex
देश विदेश

Cyclone : चक्रीवादळाच्या तडाख्यानं पश्चिम बंगाल हादरलं, थेट मुख्यमंत्र्यांना घटनास्थळी जावं लागलं!

Rohini Gudaghe

Latest Cyclone Update News

पश्चिम बंगालच्या (West Bengal) जलपाईगुडी जिल्ह्यात रविवारी (31 मार्च) दुपारी भीषण चक्रीवादळ (Cyclone) आलं. यामध्ये मोठ्या प्रमाणात जीवित व वित्तहानी झाली आहे. राज्याच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी रविवारी रात्री घटनास्थळाचा आढावा घेण्यासाठी तेथे पोहोचल्या होत्या. त्यांनी रुग्णालयात जखमींची भेट घेतली. प्रशासन सर्व प्रकारच्या मदतीसाठी उभे असल्याचं आश्वासन त्यांनी दिलं आहे.

 (Latest Marathi News)

पश्चिम बंगालच्या जलपाईगुडी जिल्ह्यात रविवारी दुपारी भीषण चक्रीवादळाचा तडाखा बसला. त्यामुळे परिसरात मोठी नासधूस झाली आहे. जिल्ह्याच्या बहुतांश भागात गारपिटीसह सोसाट्याच्या वाऱ्यामुळे (Cyclone In West Bengal) अनेक घरांचं नुकसान झालं. झाडे उन्मळून पडली, विजेचे खांब पडले. या वादळामुळे आतापर्यंत 5 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळतेय. तर अनेकजण जखमी झाले आहेत.

(साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

राज्याच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी चक्रीवादळामुळे झालेल्या वादळावर शोक व्यक्त केला आहे. मुख्यमंत्र्यांनी तिचा कार्यक्रम रद्द करून रविवारी रात्रीच जलपाईगुडी (Cyclone News) गाठली. त्यांनी परिसराचा आढावा घेतला आणि चक्रीवादळामुळे प्रभावित झालेल्या लोकांना भेटण्यासाठी जलपाईगुडी सुपर स्पेशालिटी हॉस्पिटललाही भेट दिली.

रविवारी पश्चिम बंगालला धडकलेल्या चक्रीवादळाने मोठा विध्वंस केला आहे. रविवारी दुपारी साडेतीनच्या सुमारास हे वादळ आलं. सुमारे 10 मिनिटं चाललेल्या वादळाने मोठ्या प्रमाणात नुकसान केलं (Cyclone Update) आहे. या वादळाच्या तडाख्यात लाखो झाडे उन्मळून पडली आणि शेकडो घरांचं नुकसान झालं आहे. या वादळामध्ये द्विजेंद्र नारायण सरकार (52), अनिमा रॉय (49), जोगेन रॉय (70) आणि समर रॉय (64) यांचा मृत्यू झाल्याचं समोर आलं आहे.

प्रसारमाध्यमांशी बोलताना मुख्यमंत्री ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) यांनी सांगितलं की, या आपत्तीमुळं अनेक घरांचे नुकसान झालंय, पाच लोकांचा मृत्यू झाला आहे. जखमींमधील दोघांची प्रकृती चिंताजनक आहे. प्रशासन घटनास्थळी उपस्थित असून आवश्यक ते सर्व सहकार्य केले जात असल्याची ग्वाही त्यांनी दिली आहे. पीडितांना मदत करण्यासाठी सरकार सर्वतोपरी प्रयत्न करत असल्याचं त्यांनी सांगितलं आहे. प्रशासन गरजू लोकांच्या पाठीशी उभे राहील, असं आश्वासन ममता बॅनर्जी यांनी दिलं आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Jarange vs BJP: मराठे भाजपचा एन्काऊंटर करणार; मनोज जरांगेंचा ट्रॅप, महायुतीला ताप?

Central Railway: मध्य रेल्वे मार्गावर कसाऱ्याजवळ स्पेशल पॉवर ब्लॉक, काही ट्रेनच्या मार्गात बदल तर काही रद्द; वाचा लिस्ट

Pune Crime: मोबाईल काढून घेतल्याने अल्पवयीन मुलाचा आईवर हल्ला, लाथाबुक्क्यांनी मारहाण अन् कात्रीने वार, पुण्यात खळबळ

Indian Oil Job: सरकारी नोकरीची संधी, इंडियन ऑइलमध्ये 'या' पदांसाठी निघाली भरती; अशा पद्धतीने करा अर्ज

Viral Video: मस्तच भावा! 'फुलवंती' गाण्यावर तरुणाचा गुलीगत डान्स; बेधुंद होऊन नाचला, VIDEO ला हजारोंची पसंती

SCROLL FOR NEXT