Amit Shah saam tv
देश विदेश

Cyclone Biparjoy Review Meeting : पुराचा धोका कमी करण्यासाठी मुंबई, पुण्यासह 7 शहरांसाठी 2500 कोटींची योजना, अमित शाह यांची घोषणा

Amit Shah Big Announcement: दिल्लीतील विज्ञान भवनात अमित शाह यांच्या अध्यक्षतेखाली सोमवारी आपत्ती व्यवस्थापनाची महत्त्वाची बैठक पार पडली. :

Priya More

Delhi News: देशातील सर्वाधिक लोकसंख्या असलेल्या मुंबई, पुण्यासह 7 शहरांमध्ये पुराचा धोका (flood risk) कमी करण्यासाठी केंद्र सरकारने महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे. या शहरांसाठी केंद्र सरकारने 2500 कोटी रूपयांचे प्रकल्प उभारले जाणार असल्याची महत्त्वाची घोषणा केली. केंद्रीय गृह मंत्री अमित शाह (AMit Shah) यांनी ही घोषणा केली आहे. दिल्लीतील विज्ञान भवनात अमित शाह यांच्या अध्यक्षतेखाली सोमवारी आपत्ती व्यवस्थापनाची महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीत अमित शाह यांनी ही घोषणा केली.

या बैठकीमध्ये मुंबई, पुणे या शहरांसह चेन्नई, कोलकाता, बंगळुरू, हैदराबाद, अहमदाबाद या सात सर्वाधिक लोकसंख्या असलेल्या शहरांचा समावेश असल्याची माहिती अमित शाह यांनी दिली. त्यांनी देशभरातील आपत्ती व्यवस्थापनासाठी 8 हजार कोटींहून अधिक किमतीच्या तीन महत्त्वपूर्ण योजना जाहीर केल्या. त्यानुसार राज्यांमध्ये अग्निशमन सेवांचा विस्तार आणि आधुनिकीकरण करण्यासाठी 5 हजार कोटींचे प्रकल्प उभारले जातील.

शहरांमधील पुराचा धोका कमी करण्यासाठी सात सर्वाधिक लोकसंख्येच्या महानगरांसाठी 2,500 कोटींचे प्रकल्प उभारले जातील. तसेच भूस्खलन शमन करण्यासाठी 17 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये 825 कोटी रूपयांची राष्ट्रीय भूस्खलन जोखीम शमन असे महत्त्वाचे प्रकल्प उभारले जाणार असल्याची घोषणा अमित शहा यांनी यावेळी केली.

यासोबतच 350 अति जोखीम आपत्ती प्रवण जिल्ह्यांमध्ये सुमारे एक लाख युवा आपदा मित्र (स्वयंसेवक) तयार करण्याचे लक्ष्य निश्चित केले असल्‍याचे देखील त्यांनी यावेळी सांगितले. त्यांच्या या निर्णयामुळे आपत्ती उद्भवल्यास त्यातून जलदरित्या बाहेर निघता येईल. राज्यात या पद्धतीचे प्रशिक्ष‍ित आपदा मित्र आठ हजारांच्या वर आहेत. महाराष्ट्र राज्य असे पहिले राज्य आहे ज्यांनी प्रशिक्षित आपदा मित्र अशी संकल्पना राबवून प्रत्यक्ष अंमलबजावणी केली.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Final Results: रोहित पवार पिछाडीवर, राम शिंदे आघाडीवर

Baramati Election Result: निकालाआधीच बारामतीत उधळला गुलाल! ,सुनेत्रा पवारांवर JCB ने फुलांचा वर्षाव - VIDEO

Dombivali Vidhan Sabha : डोंबिवलीत मतदान केंद्रात ठाकरे पदाधिकारी कार्यकर्त्यांचा गोंधळ

VIDEO : महायुतीची मुसंडी, अमित शहांकडून फडणवीसांचं अभिनंदन | Marathi News

Kinshuk Vaidya : शुभ मंगल सावधान! 'शाका लाका बूम बूम' फेम संजूच्या डोक्यावर पडल्या अक्षता, गर्लफ्रेंडसोबत थाटला संसार

SCROLL FOR NEXT