Update Your Aadhaar Details : आधार तपशील 14 जूनपर्यंत मोफत अपडेट करण्याची संधी! कसे करायचे ते येथे पाहा

Aadhaar Details Update Free : तुम्ही तुमचे आधार कार्ड तपशील आतापर्यंत एकदाही अपडेट केले गेले नसेल तर पुढील दोन दिवसात ते मोफत अपडेट करून शकता.
Update Your Aadhaar Details Free
Update Your Aadhaar Details Free saam tv
Published On

Update Your Aadhaar Details Free Of Cost Till June 14: भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरणाने (UIDAI) नागरिकांना त्यांचे डेमोग्राफीक तपशील नवीन माहितीसह अपडेट करण्याचे आवाहन केले आहे. UIDAI नुसार जर तुमचे आधार कार्ड दहा वर्षांपूर्वी जारी केले गेले असेल आणि ते आतापर्यंत एकदाही अपडेट केले गेले नसेल तर तुम्ही पुढील दोन दिवसात ते मोफत अपडेट करून शकता.

UIDAI ने 15 मार्च 2023 रोजी एका प्रेस स्टेटमेंटमध्ये म्हटले होते की, 15 मार्च 2023 ते 14 जून 2023 या कालावधीत लोकांना आधार कार्डवरील माहिती अपडेट करण्याचे आवाहन केले होते. तुमचा ओळखीचा पुरावा आणि पत्त्याचा पुरावा ऑनलाइन विनामूल्य अपडेट आणि अपलोड करू शकता. आधार कार्डवरील माहिती मोफत अपडेट https://myaadhaar.uidai.gov.in वर जाऊन करता येईल आणि CSC वर अपडेट करण्यासाठी नेहमीप्रमाणे 50 रुपये आकारले जातील.

Update Your Aadhaar Details Free
Aadhar Card For Child : तुमच्या मुलाचे आधार कार्ड बनवायचे आहे ? मग, या ऑनलाइन स्टेप्स फॉलो करा

अॅड्रेस फ्रूप अपलोड करण्यासाठी स्टेप्स

- सर्वप्रथम https://myaadhaar.uidai.gov.in/ ला भेट द्या

- लॉगिन करा. 'नाव/लिंग/जन्म तारीख आणि पत्ता अपडेट' पर्याय निवडा

- ‘अपडेट आधार ऑनलाइन’ वर क्लिक करा

- डेमोग्राफीक पर्यायांच्या सूचीमधून 'पत्ता' निवडा आणि 'आधार अपडेट करण्यासाठी पुढे जा' वर क्लिक करा.

- स्कॅन केलेली प्रत अपलोड करा आणि आवश्यक माहिती प्रविष्ट करा.

- 50 रुपये पेमेंट करा. (15 जूनपर्यंत आवश्यक नाही).

- सेवा विनंती क्रमांक (SRN) व्युत्पन्न केला जाईल. ते नंतर ट्रॅकिंग स्थितीसाठी जतन करा. अंतर्गत गुणवत्ता तपासणी पूर्ण झाल्यावर, तुम्हाला एक एसएमएस प्राप्त होईल. (Breaking News)

Update Your Aadhaar Details Free
DRDO Recruitment: तरुणांसाठी कामाची बातमी! डीआरडीओमध्ये मेगाभरती; जाणून घ्या अर्ज प्रक्रिया

तुमची अपडेट रिक्वेस्ट अशी ट्रॅक करा

ऑनलाइन पत्ता बदलण्याची विनंती यशस्वीरित्या सबमिट केल्यानंतर तुम्हाला 0000/00XXX/XXXXX या फॉरमॅटमध्ये एक URN दिला जाईल. तो स्क्रीनवर प्रदर्शित होईल आणि तुमच्या नोंदणीकृत टेलिफोन नंबरवर एसएमएसद्वारे पाठवला जाईल. हा URN आणि तुमचा आधार क्रमांक वापरून तुम्ही तुमच्या आधार अपडेटची स्थिती या https://ssup.uidai.gov.in/checkSSUPStatus/checkupdatestatus संकेतस्थळावर जाऊन पाहू शकता. (Latest Marathi News)

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com