Hydrabad Gold Seized By Customs ANI
देश विदेश

Hyderabad Gold Seized By Customs: अंडरवेअरमधून करत होता 20 लाखांच्या सोन्याची तस्करी, एअरपोर्टवर पोहचताच झाली पोलखोल; पाहा VIDEO

Hyderabad Rajiv Gandhi International Airport: आरोपीची कस्टम अधिकाऱ्यांकडून चौकशी सुरु आहे.

Priya More

Hydrabad News: हैदराबादमध्ये (Hydrabad) सोन्याच्या पेस्टची (gold paste) तस्करी करणाऱ्या प्रवाशाला पोलिसांनी अटक केली. हैदराबादच्या राजीव गांधी एअरपोर्टवर (Hyderabad Rajiv Gandhi International Airport) ही कारवाई करण्यात आली आहे. आरोपीने हे सोनं आपल्या अंडरवेअरमध्ये लपवून आणले होते. पण एअरपोर्टवर दाखल होताच त्याची पोलखोल झाली. जवळपास 20 लाख रुपयांचे हे सोनं आहे. हा प्रवासी शारजाहून प्रवास करत होता.

मिळालेल्या माहितीनुसार, हैदराबादच्या राजीव गांधी विमानतळावर बुधवारी कस्टम अधिकाऱ्यांकडून ही कारवाई करण्यात आली आहे. एक प्रवासी 331 ग्रॅम सोनं अंडरवेअरमध्ये लपवून तस्करी करत होता. पण त्याचा हा प्रयत्न फसला. एअरपोर्टवर पोहचल्यानंतर कस्टम अधिकाऱ्यांनी त्याला अटक केली. आरोपीकडून जप्त केलेल्या सोन्याची किंमत सुमारे 20 लाख रुपये आहे. कस्टम अधिकाऱ्यांनी अंडरवेअरमधील सोन्याची पेस्ट काढतानाचा व्हिडिओ शूट केला आहे. हा व्हिडिओ एएनआय या वृत्तसंस्थेने पोस्ट केला आहे.

कस्टम अधिकाऱ्यांनी सांगितले की, तपासणीदरम्यान या प्रवाशाच्या अंडरवेअरमध्ये काही तरी असल्यासारखे वाटले. तपासणी केली असता या प्रवाशाने अतिशय शिताफीने 331 ग्रॅम वजनाची सोन्याची पेस्ट अंडरवेअरमध्ये लपवली होती. हा प्रवासी सोन्याची तस्करी करत असल्यामुळे त्याला कस्टम अधिकाऱ्यांनी तात्काळ अटक केली. आरोपीची कस्टम अधिकाऱ्यांकडून चौकशी सुरु आहे. हे सोनं तो कुठून आणि कोणाच्या सांगण्यावरुन भारतात आणत होता याचा तपास करण्याचा प्रयत्न सुरु आहे. हा आरोपी हे सोनं शारजाहून आणत होता.

दरम्यान, मागच्या वर्षी हैदराबादच्या याच एअरपोर्टवर महिला अंडरगारमेंटमध्ये 1.72 कोटी सोने रुपयांचे सोनं भारतात आणत होत्या. हैदराबादमधील सीमा शुल्क विभागाने सोन्याची तस्करी करणाऱ्या तीन महिलांना अटक केली होती. महिलांनी दुबईहून अंडरवेअर आणि ब्रामध्ये सुमारे 1.25 कोटी रुपयांचे सोने आणले होते. पण या महिलांचा सोन्याची तस्करी करण्याचा प्रयत्न फसला आणि त्यांनी अटक करण्यात आली.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Updates: कार्तिकी यात्रेत विठ्ठल चरणी साडेतीन कोटींचे दान

लठ्ठपणामुळे मधुमेह होतो का? या दोघांमधील संबंध समजून घ्या...

Narayan Rane : महायुती आणि उद्धव ठाकरेंचे किती उमेदवार निवडून येतील? नारायण राणेंनी थेट आकडाच सांगितला

Diljit Dosanjh: दारूबंदी करा मग गाण्यांवर बंदी घाला, दिलजीत दोसांजचं सरकारच्या नोटिशीला उत्तर, काय आहे प्रकरण?

Pitbull And Ieopard Fight: पिटबूल आणि बिबट्यामध्ये थरारक झुंज; दोघे एकमेकांवर पडले भारी, अंगावर काटा आणणारा व्हिडिओ पाहिलात का?

SCROLL FOR NEXT