Petrol Diesel Price Today, Crude Oil Price Today, Petrol Price In India, Diesel Price In India Maharashtra Saam TV
देश विदेश

Petrol Diesel Prices : कच्च्या तेलाचे भाव पुन्हा घसरले; पेट्रोल डिझेल आणखी स्वस्त? पाहा आजचा भाव

महाराष्ट्रात पेट्रोल 5 तर डिझेल 3 रुपयांनी स्वस्त झालं आहे.

साम टिव्ही ब्युरो

नवी दिल्ली : जुन महिन्यात जागतिक बाजारात कच्च्या तेलाच्या (Crud Oil) किंमतीत मोठी वाढ झाली होती. आता जुलै महिन्याच्या सुरूवातीपासून कच्च्या तेलाच्या किंमतीत सातत्याने घसरण होत आहे. शुक्रवारी सकाळी सुद्धा जागतिक बाजारात कच्च्या तेलाचे दर घसरले. दरम्यान, कच्च्या तेलाचे दर कमी होताच भारतीय पेट्रोलियम कंपन्यांनी पेट्रोल-डिझेलचे (Petrol-Diesel) दर जारी केले आहेत. (Petrol Diesel Price Today)

मागील काही दिवसांपासून आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किंमतीत घसरण होत आहे. शुक्रवारी सकाळी ब्रेंट क्रूड 100 डॉलरच्या खाली राहिले. इंटरनॅशनल एनर्जी एजन्सीच्या (IEA) माहितीनुसार, येत्या काळात इंधनाचा दर कमी होईल त्यामुळे कच्च्या तेलाचे दर आणखी कमी होतील. कच्च्या तेलाच्या सततच्या घसरणीच्या दरम्यान, भारतीय पेट्रोलियम कंपन्यांनी पेट्रोल डिझेलचे नवे दर जारी केले आहेत. (Crude Oil Price Today)

ज्यामध्ये आजही कोणताही बदल करण्यात आलेला नाही. दिल्लीत अजूनही पेट्रोलचा दर 96.72 रुपये प्रतिलिटर तर डिझेलचा दर 89.62 इतका आहे. 6 एप्रिलपासून कंपन्यांनी त्याच्या किमती वाढवल्या नाहीत, तर क्रूडच्या किमती एकदा प्रति बॅरल 140 डॉलरवर गेल्या होत्या. जागतिक बाजारात आज सकाळी ब्रेंट क्रूड प्रति बॅरल 95.67 डॉलरवर होता. (Diesel Price In India Maharashtra)

महाराष्ट्रात पेट्रोल 5 तर डिझेल 3 रुपयांनी स्वस्त

दुसरीकडे महाराष्ट्र सरकारने पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. पेट्रोलचा दर 5 रुपयांनी तर डिझेलचा दर 3 रुपयांपर्यंत कमी करण्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे. एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर पहिल्याच दिवशी इंधन दरकपात करण्याचे संकेत दिले होते. येणाऱ्या काळात लवकरच पेट्रोल आणि डिझेलचे दर कमी करु, असे एकनाथ शिंदे यांनी सांगितले होते. त्यानुसार ही इंधन दरकपातीची घोषणा करण्यात आली. त्यामुळे महाराष्ट्रात पेट्रोल 5 तर डिझेल 3 रुपयांनी स्वस्त झालं आहे. (Petrol Diesel Prices Cut In Maharashtra)

4 प्रमुख महानगरांमधील पेट्रोल-डिझेलचे दर

मुंबई - पेट्रोल 106.35 रुपये प्रति लीटर आणि डिझेल 94.28 रुपये प्रति लीटर.

दिल्ली - दिल्लीत पेट्रोलचा दर प्रतिलिटर 96.72 आणि डिझेलचा दर 89.62 इतका आहे.

चेन्नई - चेन्नईत पेट्रोल 102.63 रुपये प्रतिलिटर आणि डिझेल 94.24 रुपये प्रतिलिटर इतक्या दराने विकलं जातंय.

कोलकाता - कोलकत्यामध्ये पेट्रोलचा दर प्रतिलिटर 106.03 रुपये आणि डिझेल दर प्रतिलिटर 92.76 रुपये इतका आहे. (Petrol Diesel Price Today)

Edited By - Satish Daud

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Viral Video: मराठी बोलल्यानं तिकीट नाकारलं! नाहूरमध्ये नेमकं काय घडलं? - VIDEO

Ramdas Athawale : एकनाथ शिंदेंची केंद्रात रवानगी होणार? रामदास आठवलेंच्या दाव्यामुळे राज्यात खळबळ,VIDEO

Shocking News: पालकांनो, मुलांना पुऱ्या देताय सावधान! पुरीनं घेतला मुलाचा जीव- VIDEO

Maharashtra Politics : एकनाथ शिंदेंचा देवेंद्र फडणवीसांशी अबोला आणि दुरावा? पडद्यामागे काय सुरु? VIDEO

Kalyan Fire News: कल्याणमध्ये इमारतीच्या १३ व्या मजल्यावर भीषण आग, रहिवाशांमध्ये घबराट,VIDEO

SCROLL FOR NEXT