Petrol Diesel Latest Price Saam TV
देश विदेश

Petrol Diesel Price : कच्चे तेल पुन्हा २ डॉलरने महागले, आज पेट्रोल आणि डिझेलचे दर किती?

जाणून घ्या तुमच्या शहरातील इंधनाचे दर

वृत्तसंस्था

Petrol Diesel Price : जागतिक बाजारात कच्च्या तेलाच्या किमती सलग दुसऱ्या दिवशी प्रति बॅरल 2 डॉलरने वाढ झाली आहे. दरम्यान, गुरुवारी सकाळी सरकारी तेल कंपन्यांनीही पेट्रोल (Petrol) आणि डिझेलचे (Diesel) किरकोळ दर जाहीर केले आहेत. आज, बहुतेक शहरांमध्ये किरकोळ दरात कोणताही बदल झालेला नाही. दिल्ली-मुंबईसारख्या देशातील चारही महानगरांमध्ये आजही तेल कंपन्यांनी पेट्रोल आणि डिझेलचे दर स्थिर ठेवले आहेत.

सरकारी तेल कंपन्यांच्या म्हणण्यानुसार, आज सकाळी गौतम बुद्ध नगर जिल्ह्यात (नोएडा-ग्रेटर नोएडा) पेट्रोल 27 पैशांनी स्वस्त झाले असून 96.65 रुपये प्रति लिटर इतके झाले आहे आणि डिझेल 26 पैशांनी स्वस्त झाले असून 89.82 रुपये प्रति लिटरने विकले जात आहे. मात्र, आज यूपीच्या इतर मोठ्या शहरांमध्ये पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कोणताही बदल झालेला नाही. बिहारमध्येही इंधनाचे दर स्थिर आहेत.

चार महानगरांमध्ये पेट्रोल-डिझेलचे दर

– दिल्लीत पेट्रोल 96.72 रुपये आणि डिझेल 89.62 रुपये प्रति लिटर

– मुंबईत पेट्रोल 106.31 रुपये आणि डिझेल 94.27 रुपये प्रति लिटर

– चेन्नईमध्ये पेट्रोल 102.63 रुपये आणि डिझेल 94.24 रुपये प्रति लिटर

– कोलकात्यात पेट्रोल 06.03 रुपये. डिझेल 92.76 रुपये प्रति लिटर

घरबसल्या जाणून घेऊ शकता पेट्रोल-डिझेलचे दर

तुम्ही आता घरबसल्या एसएमएसद्वारे पेट्रोल डिझेलचे दैनंदिन दर देखील जाणून घेऊ शकता. त्यासाठी तुम्हाला आपल्या मोबाईलमधून RSP आणि आपल्या शहरातील कोड टाकून 9224992249 या क्रमांकावर मॅसेज पाठवावा लागेल. BPCL ग्राहक RSP आणि त्यांचा शहर कोड 9223112222 या क्रमांकावर पाठवून माहिती मिळवू शकतात. HPCL ग्राहक HPP price आणि त्यांचा शहर कोड लिहून आणि 9222201122 या क्रमांकावर पाठवून किंमत जाणून घेऊ शकतात. 

Edited By - Shivani Tichkule

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Healthy Life : रात्री झोपण्यापूर्वी मोबाईल स्क्रोल करण्याची सवय आहे? शरीराचे काय होते जाणून हादरून जाल

Maharashtra News Live Update: शक्तिपीठाविरोधात13 जिल्ह्यातील शेतकऱ्यांची सद्बुद्धी दिंडी

तुकाराम मुंढेंची धडक कारवाई! दूध वाढवण्यासाठी म्हशींना दिली जात होती बंदी असलेली इंजेक्शन्स

Jennifer Winget Marriage: घटस्फोटाच्या १२ वर्षांनंतर प्रसिद्ध अभिनेत्री अडकली विवाह बंधनात, नवऱ्यासोबतचे रोमँटिक फोटो व्हायरल

Corn Appe Recipe : नाश्त्याला पोहा-उपमा खाऊन कंटाळा आला? ट्राय करा मऊशार मका आणि रव्याचे आप्पे; झटपट होईल तयार

SCROLL FOR NEXT