Mumbai News : मुंबईत गोवरनं धडकी भरवली; रुग्णांच्या संख्येत दुपटीनं वाढ, 62 ठिकाणी उद्रेक

कोरोना व्हायरसनंतर आता मुंबईत गोवरचा उद्रेक पाहायला मिळत आहे. गेल्या काही दिवसांपासून मुंबईत गोवरचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढला आहे.
Measles Disease
Measles DiseaseSaam Tv
Published On

मुंबई : कोरोना व्हायरसनंतर आता मुंबईत गोवरचा उद्रेक पाहायला मिळत आहे. गेल्या काही दिवसांपासून मुंबईत गोवरचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढला आहे. गेल्या दोन महिन्यांत मुंबईत गोवर रुग्ण मोठ्या प्रमाणात आढळत आहेत. काही मुलं ही व्हेंटिलेटरवर असल्याचीही माहिती आहे. गोवरच्या वाढत्या प्रकरणांमुळे बीएमसी सतर्क झाली असून गोवरचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी उपाययोजना सुरू करण्यात आल्या आहेत. दरम्यान, बुधवारी (14 डिसेंबर) मुंबईत १० गोवरच्या १० नवीन रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. (Latest Marathi News)

Measles Disease
Aurangabad Crime : २२ वर्षीय मुलीसोबत मांत्रिकाचं क्रूर कृत्य; धक्कादायक घटनेनं औरंगाबादेत खळबळ

त्यामुळे मुंबईतील गोवर बाधितांची संख्या ४७२ वर पोहचली आहे. तर दिवसभरात ३८ संशयित रुग्णांची नोंद झाल्याने ही संख्या ५ हजार १७ वर गेली आहे. सध्या दोन रुग्ण वेंटिलेटवर असून १५ रुग्ण ऑक्सिजन वर असल्याची माहिती आरोग्य विभागाकडून देण्यात आली.

मुंबईच्या गोवंडी परिसरात गोवरचा पहिला रुग्ण आढळल्यानंतर गोवरचा झपाट्याने प्रसार होत आहे. मुंबईत ६२ ठिकाणी गोवरचा उद्रेक झाला आहे. भायखळा, वरळी, वडाळा, धारावी, अंधेरी पूर्व, कुर्ला , भांडुप, मालाड, चेंबूर, गोवंडी, दहिसर या भागात गोवरचे सर्वाधिक रुग्ण आढळले आहेत.

Edited By - Satish Daud

Measles Disease
Mega Block : चाकरमान्यांसाठी महत्वाची बातमी; मध्य रेल्वेवर शुक्रवारी विशेष मेगा ब्लॉक, कुठे आणि कधी? वाचा

दरम्यान, राज्यासह मुंबईत गोवरचा वाढता प्रादुर्भाव पाहता, राज्यातील सर्व वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालय येथे गोवर प्रतिबंधक उपाययोजना आणि लसीकरण मोहीम राबविण्यासंदर्भात गतीने कार्यवाही व्हावी, असे निर्देश राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीष महाजन यांनी दिले.

राज्यातील वैद्यकीय महाविद्यालय आणि सर्वोपचार रुग्णालय येथे गोवर प्रतिबंधासाठी सुरू असलेल्या उपाययोजनांची माहिती घेतली. त्या-त्या जिल्ह्यातील गोवर रुग्णांची संख्या, विलगीकरण व्यवस्था, खाटांची संख्या, औषधांची उपलब्धता, आदीबाबत माहिती घेतली. अधिकाधिक लसीकरण होईल, यासाठी यंत्रणेने प्रयत्न करावेत. गोवर प्रतिबंध बाबत जनजागृती व्हावी, अशा सूचना त्यांनी दिल्या.

Edited By - Satish Daud

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com