Pakistan Viral VIDEO Saam TV
देश विदेश

Pakistan News : ती रडली, हातापाया पडली, एका 'ड्रेस'मुळे लोकांनी पतीसमोरच महिलेला घेरलं; पाकिस्तानातील चीड आणणारा VIDEO

Pakistan Women Viral Video : लाहोरमधील ही घटना आहे. एक महिला आचरा बाजारातील एका हॉटेलमध्ये जेवण करण्यासाठी आली होती.

प्रविण वाकचौरे

Pakistan Viral Video :

पाकिस्तानातील बिघडलेल्या सामाजिक स्थितीबाबत रोज काहीना काही बातम्या बाहेर येत असतात. अशाच एका घटनेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. एका महिलेने अरबी प्रिंट असलेला कुर्ता घातला म्हणून हॉटेलमध्येच नागरिकांनी घेरलं. मॉब लिचिंगसारखी परिस्थिती तिथे निर्माण झाली होती. एका वरिष्ठ महिला अधिकाऱ्याने घटनास्थळी येत परिस्थिती हाताळून महिलेला गर्दीतून सुखरुप बाहेर काढलं आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

मिळालेल्या माहितीनुसार, लाहोरमधील ही घटना आहे. एक महिला आचरा बाजारातील एका हॉटेलमध्ये जेवण करण्यासाठी आली होती. तिने घातलेल्या कुर्त्यावर अरबी भाषेत काहीतरी लिहिलं होतं. कुराणातील आयत लिहिलं असल्याचा लोकांचा समज झाला. त्यानंतर तिथे जमलेल्या गर्दीने महिलेला अर्वाच्च भाषेत जाब विचारला. लोक महिलेच्या अंगावर धावून जात होते. महिला आणि तिचा पती लोकांची गर्दी पाहून घाबरले असल्याच व्हिडीओत दिसत आहेत. (Latest Marathi News)

महिला पोलीस अधिकाऱ्याची कौतुकास्पद कामगिरी

काही लोकांना याबाबत पोलिसांना माहिती दिली. त्यानंतर काही वेळातच पोलीस तेथे दाखल झाले. एएसपी सय्यदा शहाराबानो नक्वी यांनी घटनास्थळी येत संतापलेल्या गर्दीला नियंत्रणात आणलं. सय्यदा यांनी मोठ्या हिमतीने महिलेला गर्दीतून बाहेर काढून पोलीस ठाण्यात आणले. महिला पोलीस अधिकाऱ्याने दाखवलेल्या शौर्याबद्दल पंजाब पोलिसांनी तिला मानाच्या कायद-ए-आजम पुरस्काराने सन्मानित केलं.

महिलेने चुकी नसताना मागितली माफी

चूक नसतानाही महिलेने घडलेल्या प्रकाराबद्दल माफी मागितली आहे. 'मला कुर्ता आवडला म्हणून मी तो विकत घेतला. लोक असा विचार करतील असं वाटलं नव्हतं. कुराणचा अपमान करण्याचा माझा कोणताही हेतू नव्हता. या घटनेबद्दल मी माफी मागतो', असं महिलेने म्हटलं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

आरोप करून पळ काढू नका; अजित पवारांबाबत निर्णायक भूमिका घ्या, नाहीतर माफी मागा, उद्धव ठाकरेंचा घणाघात|VIDEO

दुबार मतदार आढळला तर जागेवर फोडून काढा, मनसे- शिवसैनिकांना राज ठाकरेंचा आदेश|VIDEO

Raj Thackeray: शिवाजीपार्कमधील सभेत राज ठाकरेंनी का व्यक्त केली दिलगीरी, नेमकं काय घडलं?

एमआयएम-काँग्रेस युती, ड्रग्स ते बदलापूर बलात्कार प्रकरणाचा आरोपी नगरसेवक, राज ठाकरेंनी भाजपचे कपडेच फाडले|VIDEO

Raj Thackeray: राज ठाकरेंनी अदानींचा दाखवला 'तो' व्हिडिओ; Video पाहताच अख्खा महाराष्ट्र हादरला

SCROLL FOR NEXT