VAranasi Viral video
VAranasi Viral video  Saam TV
देश विदेश

Viral Video : होळीच्या नावाखाली जोडप्यासोबत टवाळखोरांचं गैरवर्तन, वाराणसीतील संतापजनक व्हिडीओ समोर

प्रविण वाकचौरे

Viral Video :

देशभरात होळी मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात खेळली गेली. होळीचे अनेक फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. मात्र होळी सणाला गालबोट लावणारा एक संतापजनक व्हिडीओ समोर आला आहे. टवळखोरांनी एका जोडप्यासोबत गैरवर्तन केल्याचा प्रकार समोर आला आहे. या घटनेचा व्हिडीओ समोर आला आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

मिळालेल्या माहितीनुसार, वाराणसीतील मणिकर्णिका घाटावरील ही घटना असल्याचं समजतं. एक तरुण आणि तरुणी मणिकर्णिका घाटावर होळीच्या दिवशी आले होते.  होळी सण साजरा करण्यासाठी मोठी गर्दी त्याठिकाणी जमली होती. या गर्दीत काही टवाळखोर देखील होते. या टवाळखोरांनी या जोडप्याला त्रास देण्याचा प्रयत्न केला.

मणिकर्णिका घाटावरुन जाताना तरुणीच्या अंगावर फुगे मारण्यात आले. पाणी फेकण्यात आलं. एकाने समोरुन येत तरुणीच्या अंगावर बाटलीने पाणी ओतलं. तरुणीसोबत असलेल्या तरुणाने टवाळखोरांना जाब विचारण्याचा प्रयत्न केला. मात्र तरुणीने काही अनुचित प्रकार घडू नये म्हणून तरुणाला रोखलं. टवाळखोर जोडप्याच्या उद्देशून कमेंट्सही पास करत होते. (Viral video)

तर काहीजण 'इथून लवकर निघून जा', असंही सांगत होते. गंमत म्हणजे शेकडो लोकांचा जमाव असूनही कोणीही हस्तक्षेप करून या टवाळखोरांना रोखण्याचा प्रयत्न केला नाही. या घटनेचा व्हिडीओ आता सोशल मीडियावर व्हायरल होत असून लोक देखील संताप व्यक्त करत आहेत. या प्रकरणी पोलीस काही कारवाई करणार का याकडे लक्ष आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Akola Crime News | अकोल्यात रिल बनवण्यासाठी मुलांनी शोरूममधून चोरल्या महागड्या कार

Today's Marathi News Live : शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीची तारखा बदला; महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेची मागणी

Health Tips: बाजारातील मसाल्यांमधील इथिनोल ऑक्याईड आरोग्यासाठी धोकादायक

Liver Damage: सावधान! चेहऱ्यावर अचानक ५ लक्षणे दिसली, तर समजा लिव्हर खराब व्हायला सुरुवात झालीये

Ajit Pawar on Chandrakant Patil | बारामतीत येण्यास चंद्रकांत पाटलांना मज्जाव? अजित पवार यांचे मोठे विधान

SCROLL FOR NEXT