Lucknow Crime News
Lucknow Crime News Saam TV
देश विदेश

Lucknow Crime News: चालकाने ई-रिक्षातून शव थेट रस्त्यावर फेकलं...काळीज पिळवटून टाकणारी घटना CCTV कॅमेऱ्यात कैद

Ruchika Jadhav

Lucknow News: लखनऊमधून एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. एका व्यक्तीने आपल्या ई-रिक्षामध्ये असलेल्या प्रवाशाला मरणाच्या दारात सोडून दिलं आहे. प्रवाशाची तब्येत रिक्षात असताना अचानक बिघडू लागली. त्यामुळे त्याने त्या मुलाला खाली टाकून दिलं. यात मुलाचा मृत्यू झालाय. (Latest Crime News)

७ तास मदतीसाठी ओरडत राहिला

ई-रिक्षाचालकाने या तरुणाला रिक्षात बसवून रिक्षा रस्त्याने जात होती. यावेळी वाटेतच रिक्षात बसलेल्या तरुणाला त्रास होऊ लागला. हा त्रास पुढे इतका वाढला की, त्याला तात्काळ रुग्णालयात दाखल करणे गरजेचे होते.

मात्र इ-रिक्षाचालकाने निर्दयीपणाचा कळस गाठला. त्याने थेट आपल्या रिक्षातून त्या तरुणाला खाली काढले आणि तो तेथून निघून गेला. तब्बल ७ तास हा तरुण मृत्यूशी झूंज देत खाली पडला होता. अखेर जेव्हा त्याला रुग्णालयात नेण्यात आले तेव्हा त्याचा मृत्यू झाल्याचं डॉक्टरांनी जाहीर केलं. ही संपूर्ण घटना रस्त्यावर असलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सूरज कश्यप असे मृत तरुणाचे नाव आहे. तो गौशाला रोड परिसरातील निवासी असून सहारनपुर येथून गोंडा येथे ई-रिक्षाने निघाला होता. ही धक्कादायक घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे.

सूरज विवाहीत असून त्याच्या पत्नीला घरी आणण्यासाठी तो गेला होता. मात्र पत्नीपर्यंत पोहचण्याआधीच त्याला मृत्यूने कवटाळले आहे. पोलिसांनी त्याचे शव शवविच्छेदनासाठी पाठवले आहे. अद्याप मृत्यूचे कारण स्पष्ट झालेले नाही.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Kalyan Lok Sabha: मुख्यमंत्र्यांच्या पुत्रासाठी पंतप्रधान मैदानात! श्रीकांत शिंदेंच्या प्रचारासाठी कल्याणमध्ये मोदींची होणार सभा

Shani Dosh: तुम्हाला नेहमी अडचणी येतात? 'हे' आहेत शनिदोषाची लक्षणं

Today's Marathi News Live : मनोज जरांगे पाटील यांच्या बेळगावमधील सभेला कर्नाटक सरकारची परवानगी

Uddhav Thackeray: उद्धव ठाकरेंच्या हिंदुत्त्वाला मुस्लिमांचा पाठिंबा मिळणार?

LSG sv RR : राजस्थानसमोर लखनौचं १९७ धावांचं लक्ष्य ; के.एल. राहुल, दीपक हुडाची कडवी टक्कर

SCROLL FOR NEXT