Crime News x
देश विदेश

Crime News: 57 वर्षाच्या महिलेचं राक्षसी कृत्य; गाढ झोपेत असलेल्या जोडीदाराला जिंवत जाळलं, कारण ऐकून पोलीस चक्रावले

57 Year Old Woman Killed Her Partner : ओडिसामधील गंजम येथील एका 57 वर्षाच्या महिलेनं आपल्या घर मालकाला जिंवतपणे जाळलं. या घटनेने परिसरात खळबळ माजलीय.

Bharat Jadhav

एका 57 वर्षीय महिलेनं आपल्या घरमालकाला रॉकेल टाकून जिंवत जाळल्याची घटना ओडिसातील गंजम येथे घडलीय. याप्रकरणी पोलिसांनी आरोपी महिलेला अटक केलीय. मिळालेल्या माहितीनुसार, ही महिला 72 वर्षाच्या घर मालकासोबत 5 वर्षापासून लिव्ह -इन मध्ये राहत होती.

लिव्ह -इन-मध्ये राहणाऱ्या महिलेने आपल्या जोडीदाराला का मारलं याचे कारण पोलीस तपासात उघड झाले आहे. जोडीदाराला मारण्याचं कारण ऐकून अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुदेशना जेना असं आरोपी महिलेचं नाव आहे. तर मृत घर मालकाचे नाव हरिहर साहू असं आहे. हरिहर साहू याची संपत्ती हडपण्यासाठी महिलेनं 72 वर्षीय जोडीदाराची हत्या केलीय.

तपास पथकाचे भाग असलेले पोलीस अधिकारी , सरवण विवेक एम यांनी याप्रकरणी अधिक माहिती दिलीय. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी महिला सुदेशना ही विधवा आहे, आणि गेल्या पाच वर्षांपासून निवृत्त महसूल अधिकारी साहू यांच्यासोबत लिव्ह-इन रिलेशनशीपमध्ये राहत होती. हत्येच्या दिवशी साहू आपल्या बेडरुममध्ये झोपलेला होता. त्यावेळी जेना हिने त्याच्या अंगावर रॉकेल टाकलं त्यानंतर त्याला पेटून दिलं.

आगीत हरिहर साहू गंभीरित्या भाजले होते. त्यांना बऱ्हामपूरच्या एका हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं. परंतु त्यांना डॉक्टरांनी मृत घोषित केलं. पोलिस अधिकाऱ्यानं सांगितलं की, महिलेनं आपल्या पतीला प्लानिग करून मारलं. तसेच पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न केला. घर मालकाचा फोन तिने घराच्या अंगणात फेकून दिला होता. ज्या बॉटलमधून रॉकेल फेकलं ती बॉटलदेखील तिने आगीत फेकून ती जाळून टाकली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

White Clothes: अंत्यसंस्कारावेळी पांढरे कपडे का घालतात? कारण वाचून व्हाल आश्चर्यचकीत

डोनाल्ड ट्रम्प यांना बसला टॅरिफचा 'डंक'; सहा देशांकडून F-35 लढाऊ विमानांचा करार रद्द

ऐन निवडणुकीत गोळीबार, कुख्यात गुन्हेगाराची गोळ्या झाडून हत्या, परिसरात खळबळ

Ashish Deshmukh: 'जास्त कराल तर कापून काढू'; आमदार आशिष देशमुखांची विरोधकांना धमकी

दुसरं लग्न थेट गुन्हा ठरणार; तब्बल १० वर्षांचा तुरुंगवास भोगावा लागणार

SCROLL FOR NEXT