सी. पी. राधाकृष्णन भारताचे नवे उपराष्ट्रपती म्हणून निवड
सी पी राधाकृष्णन यांचा बी. सुदर्शन रेड्डी यांच्यावर १०० पेक्षा जास्त मतांनी विजय
सी पी राधाकृष्णन तामिळनाडूचे असून, यापूर्वी महाराष्ट्राचे राज्यपाल होते.
त्यांच्या नावावर ६७ कोटी रुपयांहून अधिक संपत्ती आहे.
उपराष्ट्रपती निवडणूक आज मंगळवारी संपन्न झाली. या निवडणुकीसाठी एनडीएकडून सी.पी. राधाकृष्णन मैदनात उतरले होते. तर इंडिया आघाडीकडून बी सुदर्शन रेड्डी मैदानात होते. या निवडणुकीत १०० हून अधिक मतांनी सी.पी. राधाकृष्णन यांचा विजय झाला. त्यामुळे सी. पी. राधाकृष्णन भारताचे नवे राष्ट्रपती ठरले आहेत. नवे उपराष्ट्रपती कोट्यवधी रुपयांचे मालक आहेत.
उपराष्ट्रपतीच्या निवडणुकीतील दोन्ही प्रमुख उमेदवार दक्षिण भारतातील होते. आता नव्याने होणारे उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन तामिळनाडूचे आहेत. सी पी राधाकृष्णन महाराष्ट्राचे राज्यपाल होते. एनडीएकडून ते उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत उतरले होते.
लोकसभा निवडणूक २०१९ मधील माहितीनुसार, सीपी राधाकृष्णन यांच्याकडे एकूण ६७,११,४०,१६६ रुपयांची संपत्ती आहे. त्यांच्याजवळ जंगम मालमत्ता ७,३१,०७,४३६ रुपये इतकी आहे. त्यात बँकेतील रक्कम, इन्शुरन्स, बॉन्ड, शेअर आणि दागिन्यांचाही समावेश आहे.
रोकड रक्कम - सी पी राधाकृष्णन (६,८७,०९० रुपये), पत्नी (१८,१५,६५१ रुपये)
बँक - ६,५३,८०७ रुपये
बाँड, डिबेन्चर आणि शेअर - १,२८,१३, ७३१ रुपये
विमा - १,३६,६७,२३५ रुपये
दागिने - पत्नीजवळ १२८४.७१ ग्रॅम सोने (३१,५०,००० रुपये) १५२.२५ कॅरेट हिरे (१,०६,५७,५०० रुपये)
जंगम मालमत्तेची रक्कम बाजाराच्या भावानुसार बदलत राहते.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.