Adar Poonawala : राज्यभरात कोरोना बाधितांच्या संख्येत मोठी वाढ होत आहे. काही नागरिकांनी स्वत:हून सुरक्षिततेसाठी तोंडाला मास्क लावण्यास सुरूवात केली आहे. कोरोनाच्या वाढत्या रुग्ण संख्येत कोरोना लसींची निर्मिती बंद झाली असून डोसची कमतरता निर्माण झाली आहे. या सर्व परिस्थितीवर भाष्य करत सिरमचे सीईओ अदर पूनावाला यांनी महत्वाची माहिती दिली आहे. (Covid News)
६० लाख कोविशिल्डचा स्टॉक उपलब्ध
अदर पूनावाला यांनी माध्यमांशी संवाद साधताना म्हटलं की, सध्या आमच्याकडे ५ ते ६ मिलिअन इतका म्हणजेच ६० लाख कोविशिल्ड लस तयार आहेत. कोरोना बाधितांची संख्या वाढत आहे मात्र चिंतेचे कारण जास्त नाही. कारण सध्याचा कोरोना हा सौम्य आहे. मात्र आपली खबरदारी म्हणून वृद्ध व्यक्ती बुस्टर डोस घेऊ शकतात.
देशात कोरोनाच्या नव्या रुग्णांची संख्या काही प्रमाणात अटोक्यात आली आहे. गेल्या चोवीस तसात ११,६९२ नवे रुग्ण आढळून आले आहेत. काल १२,५९१ नवे रुग्ण आढळून आले होते. आरोग्य विभागाच्या माहितीनुसार, देशात सध्या ६६,१७० अॅक्टिव्ह रुग्ण आहेत.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.