India Corona Update Saam TV
देश विदेश

सावध व्हा! देशात कोरोना पुन्हा वाढतोय; 24 तासांत आढळले 'इतके' रुग्ण

Corona Cases In India : गेल्या काही दिवसांपासून देशात दैनंदिन 3 हजारांहून अधिक कोरोना प्रकरणे समोर येत आहे.

साम टिव्ही ब्युरो

नवी दिल्ली: कोरोनाची तिसरी लाट (Corona Third Wave) हळूहळू ओसरल्यानंतर देशातील रुग्णसंख्या झपाट्याने कमी झाली. त्यानंतर देशासह राज्यातील निर्बंध हटवण्यात आले. परिस्थिती पूर्ववत होत असतानाच, पुन्हा एकदा देशातील काही राज्यांमध्ये कोरोनाने (Corona In India) डोकं वर काढलं आहे. त्यामुळे आरोग्य प्रशासनासह सर्वसामान्यांची डोकेदुखी वाढली आहे. देशात मागील काही दिवसांपासून दिवसागणिक 3 हजारांहून (Corona Positive) अधिक रुग्णसंख्या वाढ असल्याने आरोग्य प्रशासन सतर्क झालं आहे. (Corona Latest News in Marathi)

आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या ताज्या माहितीनुसार, गेल्या 24 तासांत देशभरात कोरोनाचे 3 हजार 805 नवे रुग्ण आढळून आले. तर याच कालावधीत 22 जणांचा मृत्यूही झाला. त्याचवेळी 3 हजार 168 रुग्णांनी कोरोनावर यशस्वी मात देखील केली. शुक्रवारी आढळून आलेल्या नव्या रुग्णांमुळे देशात कोरोनाबाधितांची सक्रिय रुग्णसंख्या 20 हजार 303 वर पोहोचली आहे. गेल्या काही दिवसांपासून देशात दैनंदिन 3 हजारांहून अधिक कोरोना प्रकरणे समोर येत आहे. चिंताजनक बाब म्हणजे मृत्युमुखी पडणाऱ्यांची संख्याही वाढली आहे.

दुसरीकडे शुक्रवारी 3 हजारांहून अधिक रुग्णांनी कोरोनावर यशस्वी मात केली. त्यामुळे कोरोनापासून बरे होण्याचा आकडा आता 4,25,54,416 वर पोहोचला आहे. गेल्या 24 तासांत कोरोनाच्या 4,87,544 चाचण्या घेण्यात आल्या. त्यानंतर एकूण चाचणीचा आकडा 84.03 कोटींवर पोहोचला आहे. देशव्यापी लसीकरण मोहिमेअंतर्गत आतापर्यंत 190.00 कोटी लसीचे डोस देण्यात आले आहेत. सध्या देशात एकूण कोरोना संसर्गाच्या 0.05 टक्के सक्रिय प्रकरणे आहेत.

Edited By - Satish Daud

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Rave Vs Party : पार्टी आणि रेव्हमध्ये काय फरक आहे?

Parenting Tips: मुलांना आपले मित्र बनवायचंय? तर फॉलो करा 'या' टिप्स

Dabeli Bhaji Recipe : दाबेलीसाठी परफेक्ट भाजी कशी बनवाल? वाचा सीक्रेट रेसिपी

Maharashtra Live News Update: कांदा उत्पादक शेतकऱ्यांना अनुदान द्या: सदाभाऊ खोत यांची मागणी

Shubman Gill: शुभमन गिलने इतिहास रचला, विराट कोहली आणि सर डॉन ब्रॅडमॅनचा रेकॉर्ड मोडला

SCROLL FOR NEXT