कोरोना डेथ सर्टिफिकेट मिळणार; केंद्र सरकारच्या गाईडलाईन्स जारी  Saam Tv
देश विदेश

कोरोना डेथ सर्टिफिकेट मिळणार; केंद्र सरकारच्या गाईडलाईन्स जारी

कोरोनामुळे मृत्यू झाला तर ते डेथ सर्टिफिकेटवर लिहिले जाणार, केंद्र सरकारने गाईडलाईन जारी केली आहे.

विहंग ठाकूर

नवी दिल्ली: सर्वोच्च न्यायालयात (Supreme Court), केंद्र सरकारने (Central Government) म्हटले आहे की कोरोनाशी (Coronavirus) संबंधित मृत्यूच्या बाबतीत मृत्यू प्रमाणपत्र जारी करण्याबाबत मार्गदर्शक तत्त्वे जारी (Guidlines) करण्यात आली आहेत. आयसीएमआर (ICMR) आणि आरोग्य मंत्रालयाने (Health Ministry) हे जारी केले आहे. सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रात केंद्राने म्हटले आहे की, केंद्र सरकारने एक परिपत्रक जारी केले आहे. आणि मृत व्यक्तीच्या नातेवाईकांना वैद्यकीय प्रमाणपत्रे देण्यात यावीत आणि मृत्यूचे कारण लिहावे असे सांगितले आहे.

मार्गदर्शक तत्त्वांनुसार, आरटीपीसीआर चाचणी किंवा एंटीजन टेस्ट किंवा क्लिनिकल तपासणीमध्ये कोविड आढळल्यास तो कोविड मानला जाईल. परंतु त्याचवेळी असे म्हटले गेले आहे की जर मृत्यूचे कारण विष, आत्महत्या किंवा अपघात असेल तर ते कोविडमुळे मृत्यू मानले जाणार नाही जरी कोविड चाचणीमध्ये कोविडची पुष्टी झाली असेल.

Edited By: Pravin Dhamale

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shivani Rangole: टिव्हीतल्या 'मास्तरीणबाई' चं सौंदर्य लाखात एक, फोटोंवर लाईक्स

Maharashtra Live News Update: खराडी पार्टीवर केलेली कारवाई राजकीय दृष्टिकोनातून करण्यात आली नाही ना? - रोहित पवार

Shocking: पोहण्यासाठी धरणात उडी मारली, परत बाहेर आलेच नाहीत; ४ जिवलग मित्रांचा मृत्यू

Shahapur : माता न तू वैरिणी! पोटच्या तीनही मुलींना आईनेच दिले जेवणातून विष; मुलींचा मृत्यू

Mhada: मुंबईतील म्हाडाच्या अधिकाऱ्याच्या पत्नीची आत्महत्या; आलिशान फ्लॅटमध्ये आयुष्याचा दोर कापला

SCROLL FOR NEXT