Covid Cases in Supreme Court
Covid Cases in Supreme Court Saam Tv
देश विदेश

Covid Cases in Supreme Court: SCमध्ये कोरोनाचा कहर; 7 न्यायाधीश, 250 कर्मचाऱ्यांना लागण

वृत्तसंस्था

दिल्ली : कोविड-19 आता विधान भवनापासून ते सर्वोच्च न्यायालयापर्यंत (Supreme Court) पोहोचला आहे. सुप्रीम कोर्टात कोरोनाचा (Covid Cases In Supreme Court) स्फोट झाला आहे. वृत्तप्रमाणे, आज सोमवारी सुप्रीम कोर्टाचे 7 न्यायाधीश आणि सुमारे 250 कर्मचारी कोविड पॉझिटिव्ह आढळले आहेत. बाधितांमध्ये सर्वोच्च न्यायालयाच्या सेक्रेटरी जनरल यांचाही समावेश आहे. सध्या ते होम आयसोलेशनमध्ये आहे. यासोबतच काही कर्मचाऱ्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. (Covid cases in supreme court marathi news today)

न्यायाधीशांना लागण झाल्याने चिंता वाढली!

रविवारी सुप्रीम कोर्टात नोंदणी कर्मचार्‍यातील 150 जणांना कोरोनाची (Corona) लागण झाल्याचे आढळून आले आहे. या बाधितांमध्ये 4 न्यायाधीशांचाही समावेश आहे. सर्वोच्च न्यायालयात मुख्य न्यायाधीश एनव्ही रमना यांच्यासह 32 न्यायाधीश आहेत. त्यामुळे आता न्यायाधीशांनाही याची लागण झाल्याने चिंता वाढली आहे.

अत्यंत महत्त्वाच्या केसेसची सुनावणी होणार;
कोरोना विषाणूची वाढती प्रकरणे पाहता सर्वोच्च न्यायालयाने 7 जानेवारीपासून संपूर्णपणे ऑनलाईन पद्धतीने सुनावणी घेण्याचा निर्णय घेतला होता. सर्वोच्च न्यायालयाने आपल्या सर्व न्यायाधीशांना त्यांच्या निवासी कार्यालयातून काम करण्याचा निर्णय घेतला आहे. याशिवाय, सर्वोच्च न्यायालयाने एका परिपत्रकाद्वारे सांगितले होते की, 10 जानेवारीपासून केवळ तातडीच्या बाबी, ताजी प्रकरण, जामीन प्रकरणे, अटक आणि देय तारखेची प्रकरणे सूचीबद्ध केली जातील.

हे देखील पहा-

संसदेतही कोरोनाचा हाहाकार;

संसदेत काम करणाऱ्या किमान 400 कर्मचारी आणि सुरक्षा कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाल्याचे आढळून आले आहे. गेल्या 6 ते 7 जानेवारी दरम्यान संसदेत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांमध्ये कोरोनाची लागण झाल्याचे सांगण्यात येत आहे. अधिकाऱ्यांनी सांगितले की, 4 ते 8 जानेवारी दरम्यान संसदेच्या 1,409 कर्मचाऱ्यांपैकी 402 कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली होती. त्यानंतर त्यांचे नमुने जीनोम सिक्वेन्सिंगसाठी पाठवण्यात आले आहेत. (Covid cases in supreme court marathi news in marathi)

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics 2024 : नाशिकच्या रिंगणात साधू-महंतांचा 'मेळा'?; स्वामी, महंतांनी लोकसभेसाठी कंबर कसली!

LSG sv RR : राजस्थानची विजयी घोडदौड कायम; लखनौवर ७ गडी राखून मिळवला विजय

Maharashtra Politics: लोकशाही टिकवण्यासाठी ही निवडणूक महत्त्वाची, साताऱ्यात शरद पवार यांचा भाजपवर हल्लाबोल

Jake Fraser-McGurk : जेक फ्रेझर-मॅकगर्कचा विक्रम थोडक्यात हुकला

Kolhapur News: लहानग्याने केला हट्ट, वाढदिवस साजरा करण्यासाठी थेट मुख्यमंत्रीच पोहोचले

SCROLL FOR NEXT