Supreme Court of India Saam TV
देश विदेश

Coronavirus In Supreme Court : धाकधूक वाढली! सर्वोच्च न्यायालयात कोरोनाचा शिरकाव; 4 न्यायाधीश Covid पॉझिटिव्ह

Supreme Court : न्यायाधीशांमध्ये बाधितांची एकून संख्या ५ इतकी होती. मात्र पाचवे न्यायाधीश यांची प्रकृती सध्या ठिक आहे.

साम टिव्ही ब्युरो

Covid -19 :देशात कोरोना विषाणू झपाट्याने पसरत चालला आहे. कोरोनाचा हा विळखा आता सर्वोच्च न्यायालयापर्यंत पोहचला आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या ( Supreme Court) ४ न्यायाधीशांना कोरोनाची लागण झाली आहे. ते कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत. न्यायाधीशांमध्ये बाधितांची एकून संख्या ५ इतकी होती. मात्र पाचव्या न्यायाधीशांची प्रकृती सध्या ठिक आहे. (Latest Covid -19 News)

सुप्रीम कोर्टातील चार न्यायाधीशांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती समोर आली आहे. न्यायमूर्ती अनिरुद्ध बोस, न्यायमूर्ती जेबी पार्डीवाला, न्यायमूर्ती एस रवींद्र भट आणि न्यायमूर्ती मनोज मिश्रा या न्यायाधीशांना कोरोनाची लागण झाली आहे. कोरोनाचा प्रदुर्भाव वाढत चालला आहे. आता थेट सुप्रीम कोर्टात देखील कोरोनाचा शिरकाव झाल्याने नागरिकांमध्ये चिंता वाढली आहे.

चिंता वाढली! देशात गेल्या 24 तासांत 10,112 नव्या कोरोना रुग्णांची नोंद

 देशामध्ये पुन्हा एकदा कोरोनाने हातपाय पसरायला सुरुवात केली आहे. गेल्या काही दिवसांपासून दिवसांला 10 हजारांपेक्षा जास्त नवीन रुग्ण समोर येत आहेत. यासोबत कोरोना रुग्णांच्या मृतांचा आकडा देखील वाढत आहे. गेल्या 24 तासांत 10 हजारांपेक्षा जास्त रुग्णांची नोंद झाली आहे. अशामध्ये देशातील सक्रीय कोरोना रुग्णांची संख्या 67 हजार पार झाली आहे.

आरोग्य मंत्रालयाच्या वेबसाइटवर दिलेल्या माहितीनुसार, राष्ट्रीय कोरोना रिकव्हरी रेट 98.66 टक्के आहे. कोरोनापासून बरे झालेल्या लोकांची संख्या 4,42,83,021 वर पोहोचली आहे, तर डेट रेट 1.18 टक्के झाला आहे. तर देशभरातील जनतेला कोरोनावरील लसीचे 220.66 कोटी डोस देण्यात आले आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

World Cup 2025: महिला टीम इंडियाचा 'कबिर खान', लेकींचं स्वप्न साकार करणारा जादूगार

Maharashtra Live News Update: रोहा-रामराज मार्गे अलिबाग जाणाऱ्या मार्गावरील पूल तुटला

अवकाळीच्या मदतीवर अधिकाऱ्यांचा डल्ला, भ्रष्ट अधिका-यांनी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनाही नाही सोडलं

व्होटी चोरीचा मुद्दा पप्पूपर्यंत पोहचला, राजकारणात आणखी किती पप्पू?

Ritesh Meshram Case: रितेश मेश्राम प्रकरणात मोठी कारवाई, हत्येचा गुन्हा दाखल झालेल्या ८ पोलिसांचे निलंबन

SCROLL FOR NEXT