India Corona Updates 25th December 2023 Saam Tv
देश विदेश

Corona in India: काळजी घ्या! देशात कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटच्या रुग्णात तिप्पट वाढ, ६ राज्यातील रुग्णांची आकडेवारी चिंताजनक

Corona Update in india: कोरोनामुळे केरळमध्ये एकाचा मृत्यू झाल्याने देशभरातील लोकांची चिंता वाढली आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, गेल्या २४ तासांत कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटच्या रुग्णात तिप्पट वाढ झाली आहे.

Vishal Gangurde

Corona virus update:

देशात पुन्हा एकदा कोरोना विषाणू हातपाय पसरू लागला आहे. कोरोनामुळे केरळमध्ये एकाचा मृत्यू झाल्याने देशभरातील लोकांची चिंता वाढली आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, गेल्या २४ तासांत कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटच्या रुग्णात तिप्पट वाढ झाली आहे. (Latest Marathi News)

रिपोर्टनुसार, देशातील सहा राज्यात जेएन.१ व्हेरिएंटच्या रुग्णाची संख्या २२ होती, आता ती संख्या ६३ वर पोहोचली आहे. एका अभ्यासातून माहिती समोर आली आहे की, कोरोनाच्या जेएन.१ व्हेरिएंटचा थेट परिणाम व्यक्तीच्या घशावर होतो. या आजारामुळे आवाजही जाण्याची शक्यता आहे. सध्या देशात कोरोनाच्या XBB व्हेरिएंटचे ९० टक्के रुग्ण आढळून येत आहे. देशात सध्या जेएन.१ व्हेरिएंटचे रुग्ण कमी आहेत.

६ राज्यात जेएन.१ व्हेरिएंटचे सर्वाधिक रुग्ण

देशात सध्या कोरोनाच्या जेएन.१ व्हेरिएंटच्या रुग्णांची संख्या ६३ आहेत. गोव्यात कोरोनाचे जेएन.१ व्हेरिएंटचे रुग्ण ३४, महाराष्ट्रात ९, कर्नाटकात ८, केरळमध्ये ६ तामिळनाडूत ४, तेलंगाणात २ आढळले आहेत.  ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

देशातील कोरोना रुग्णांची संख्या किती?

देशात गेल्या २४ तासात कोरोना-१९ चे ६२८ नवीन रुग्ण आढळले आहेत. तर देशात एकूण ४,०५४ कोरोना रुग्णांवर उपचार सुरु आहेत. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने सकाळी ८ वाजता दिलेल्या माहितीनुसार, गेल्या २४ तासांत कोरोनामुळे एकाचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे देशात कोरानाने मृत्यूमुखी पडलेल्या लोकांची संख्या ५,३३,३३४ वर पोहोचली आहे.

कोरोनातून किती रुग्ण बरे झाले?

देशात आतापर्यंत कोरोना विषाणूने बाधित झालेल्या लोकांची संख्या ४,५०, ०९,२४८ इतकी झाली आहे. तसेच आरोग्य मंत्रालयाच्या वेबसाइटनुसार, आतापर्यंत कोरोना आजारातून बरे झालेल्या लोकांची संख्या ४,४४,७१,८६० वर पोहोचली आहे.

देशात कोरोना बरे झालेल्या लोकांचा ९८.८१ टक्के इतका आहे. तर कोरोनामुळे मृत्यू होण्याचा दर १.१९ टक्के इतका झाला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Final Results: वरळीमधून आदित्य ठाकरे यांचा विजय

'Bigg Boss 18' च्या घरातून 'या' सदस्याचा पत्ता कट, बिग बॉसची भविष्यवाणी ठरली खोटी

Maharashtra Assembly Election: महाराष्ट्रात भाजपची त्सुनामी, 80 टक्के जागांवर फुलले कमळ, असा विजय कधीच मिळाला नाही

UdyanRaje Bhosle News : उदयन राजेंची शरद पवारांवर विखारी टीका, पाहा Video

Viral Video: बापरे! खोल विहिरीत महिलांनी घेतला झोका; VIDEO व्हायरल होताच नेटकरी झाले हैराण

SCROLL FOR NEXT