Mahindra Car Viral Video Saamtv
देश विदेश

Viral Video: अरे आवरा ह्यांना! स्टेअरिंग सोडले, लक्षही नाही अन् चालू गाडीत अश्लिल चाळे सुरू; नेटकरी संतापले

Car Viral Video: सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत असून दोघांवरही कारवाई करण्याची मागणी नेटकरी करत आहेत....

Gangappa Pujari

Mahindra XUV 700 Viral Video: सोशल मीडियावर आपल्याला नेहमी एकापेक्षा एक भन्नाट व्हिडिओ व्हायरल होत असतात. जे पाहून कधी आश्चर्याचा धक्का बसतो, तर कधी रागही अनावर येतो. सध्या सोशल मीडियावर अशाच एका व्हायरल व्हिडिओची जोरदार चर्चा रंगली आहे, ज्यामुळे नेटकरी चांगलेच संताप व्यक्त करत आहेत. हा व्हायरल व्हिडिओ जोडप्याचा असून ते चालू गाडीमध्येच अश्लिल चाळे करताना दिसत आहेत. काय आहे या व्हायरल व्हिडिओमागील सत्य, चला जाणून घेवू.... (Viral Video)

गाडी चालवताना चालकाची एक चूक किती महागात पडू शकते, हे आपण रोज कानावर पडणाऱ्या अपघाताच्या बातम्यांमधून पाहत असतोच. गाडी चालवताना केलेलं दुर्लक्ष संपूर्ण कुटूंबावर भारी पडल्याचीही अनेक उदाहरणे आपल्याला माहित आहेत. अशातच सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओवर नेटकरी चांगलेच भडकले आहेत..

हा व्हायरल व्हिडिओ एका जोडप्याचा असून ते चालवत असलेली गाडी महिंद्राची XUV 700 आहे. या गाडीमध्ये एडीएस (Advanced Driver Assistance System) प्रणाली दिली गेली आहे. ज्यामुळे ही गाडी चालकाविना आपोआप रस्त्यावर धावू शकते. या व्हिडिओमधील चालकानेही अशाच प्रकारे गाडीमध्ये एडीएस सिस्टिम चालू करत व्हिडिओ तयार केला आहे.

परंतु, गाडीमध्ये दिल्या गेलेल्या तंत्रज्ञानाचा अशा चुकीचा प्रकारे वापर करुन जीव धोक्यात घातल्याने नेटकऱ्यांनी या व्हिडिओवर चांगलेच ताशेरे ओढले आहेत. व्हिडिओमधील तरुण कधी सोबत असलेल्या तरुणीला मारत आहे, तर कधी सीटवर पाय ठेवत सोबत असलेल्या तरुणीसोबत मस्ती करताना दिसत आहे. त्यामुळे नेटकरी या व्हायरल व्हिडिओवर चांगलेच भडकले आहेत.

मुळात ही एडीएस सिस्टीम अपघातांचे (Road Accident) प्रमाण कमी होण्यासाठी देण्यात आली आहे, मात्र अशा उद्योगांमुळे अपघातात वाढच होईल, अशा प्रतिक्रिया अनेकांनी व्हिडिओवर दिल्या आहेत.

या व्हायरल व्हिडिओवर प्रतिक्रिया देताना नेटकऱ्यांनी त्यांच्यावर बेदरकारपणे कार चालवल्या प्रकरणी कारवाई करण्याची मागणी केली आहे. तर काही जणांनी त्यांना अपघात झाल्यावर अक्कल येईल अशा शब्दात आपला राग व्यक्त केला आहे.

काय आहे ADAS System..

अपघात कमी करण्याच्या उद्देशाने ADAS (Advanced Driver Assistance System) तयार करण्यात आले आहे. हे रडार आधारित तंत्रज्ञान आहे. विशिष्ट परिस्थितीमध्ये यामुळे कार आपोआप नियंत्रित करता येते, ज्यामुळे अपघात टाळता येतात. हे फीचर महिंद्रा XUV 700 मध्ये आहे.. (Latest Marathi News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Missing Link Project : मुंबई-पुणे प्रवासाचा वेळ आणखी कमी होणार; 'मिसिंग लिंक' प्रकल्प गेम चेंजर ठरणार, काय आहेत वैशिष्ट्ये?

Maharashtra Live News Update : शासकीय अधिकारी आणि शिवप्रेमींनी किल्ले रायगडावर साजरा केला जल्लोष

Singrauli News: म्हैस चक्क घराच्या छतावर चढली|VIDEO

Beed Crime : बीडमध्ये भयंकर घडलं! उसने दिलेले पैसे मागितल्याने महिलेला बेदम मारहाण

Multibagger stock : देनेवाला जब भी देता...! वर्षभरात एका लाखाचे झाले 8,400,000 रुपये; १०० रुपयांच्या शेअरने केली कमाल

SCROLL FOR NEXT