Shivajinagar Pune: पुण्यामध्ये गेल्या काही दिवसांपासून पोलिस भरती प्रक्रिया सुरू आहे. राज्याच्या खेड्यापाड्यातून ग्रामीण भागातून मुले या पोलिस भरतीसाठी पुण्यात दाखल झाले आहेत. पुण्यात पहिल्यांदाच आलेल्या या मुलांच्या राहण्याची सोय नसल्याने त्यांना अनेकदा फुटपाथचा आसरा घ्यावा लागतो. यावेळी अनेकदा दुर्घटनाही घडतात.
पुण्याच्या शिवाजीनगरमध्ये (Shivajinagar) अशीच मन हेलावून टाकणारी घटना समोर आली आहे, ज्यामुळे सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. लेकीला पोलिस बनवण्याचे स्वप्न घेवून आलेल्या कुटूंबावर काळाने घाला घातला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, सुरेश सखाराम गवळी वय ५५ यांची लेक ज्योती गवळी ही पोलीस भरती गेल्या अनेक दिवसांपासून प्रयत्न करत आहे. पोलीस भरतीची तारीख कळल्यानंतर आपल्या लेकीला सुरेश गवळी आणि त्यांची पत्नी ज्योती गवळी नाशिकहून पुण्याला घेऊन आले. काल रात्री पुण्यामध्ये उतरल्यानंतर त्यांनी पुण्यातल्या शिवाजीनगर परिसरातील फुटपाथवर मुक्काम देखील केला.
पहाटे दोनच्या दरम्यान मुलीचे ग्राउंड असल्याने मुलीला ग्राउंडवर सोडायला देखील ते गेले होते. मुलीला रात्री ग्राउंड वर सोडल्यानंतर शिवाजीनगर परिसरातून हॉटेल Prideच्या दिशेने चहा पिण्यासाठी म्हणून हे सुरेश गवळी निघाले असताना काळाने त्यांच्यावर काळाने घाला घातला.
मुलीला रात्री ग्राउंडवर सोडल्यानंतर शिवाजीनगर परिसरातून हॉटेल प्राईडच्या दिशेने चहा पिण्यासाठी म्हणून सुरेश गवळी निघाले. तेवढ्यात समोरून येणाऱ्या अज्ञात वाहनाने सुरेश गवळी यांना उडवलं आणि यामध्ये त्यांचा जागीच मृत्यू झाला आहे. याबाबतचा अधिक तपास आता शिवाजीनगर पोलीस करत आहेत.(Latest Marathi News)
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.