Madhya Pradesh Crime Saamtv
देश विदेश

Madhya Pradesh Crime: प्रेम प्रकरणाचा 'सैराट' शेवट! बापानेच पोटच्या लेकीसह तिच्या प्रियकराला संपवले

शिवानीच्या वडिलांनी गोळ्या झाडून आपल्या मुलीची आणि तिच्या प्रियकराची गोळ्या झाडून हत्या केली.

Gangappa Pujari

Madhya Pradesh Crime: गेल्या काही दिवसांपासून देशात हत्येच्या घटना वाढताना दिसत आहेत. प्रेम प्रकरणातून होणाऱ्या हत्या सर्वत्र चिंतेचा विषय ठरत आहेत. असाच धक्कादायक प्रकार मध्यप्रदेशमधून समोर आला आहे. ज्यामध्ये कुटूबीयांनी आपल्या मुलीसह तिच्या प्रियकराचा जीव घेतल्याचे उघडकीस आले आहे. या धक्कादायक प्रकाराने सर्वत्र एकच खळबळ उडाली आहे. (Crime News In Marathi)

याबाबत अधिक माहिती अशी की, मध्य प्रदेशात (Madhya Pradesh) एका १८ वर्षीय मुलीची आणि तिच्या २१ वर्षीय प्रियकराची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली आहे. त्यांचे मृतदेह मोठ्या दगडांना बांधून मगरी असलेल्या नदीत फेकण्यात आले, अशी हादरवून टाकणारी बातमी समोर आली आहे.

मध्य प्रदेशातील मुरैना जिल्ह्यात हा सगळा प्रकार घडला आहे. समोर आलेल्या माहितीनुसार, शिवानी तोमर या मुलीचे बालुपूरा गावातील राधेश्यामसोबत प्रेमप्रकरण सुरू होते. मुलीच्या या प्रेमप्रकरणामुळे तिच्या घरचे चांगलेच संतापले होते. याच रागातून त्यांनी दोघांचीही हत्या करण्याचा निर्णय घेतला. (Latest Marathi News)

शिवानीच्या वडिलांनी गोळ्या झाडून आपल्या मुलीची आणि तिच्या प्रियकराची गोळ्या झाडून हत्या केली. हत्येनंतर दोघांचे मृतदेह मगरींनी भरलेल्या चंबळ नदीत फेकून दिले. राधेश्यामच्या वडिलांनी आपला मुलगा बेपत्ता असल्याची तक्रार दिली. ज्यानंतर पोलिसांनी दोन्ही कुटूंबाची तपासणी करताना या भयंकर हत्येची कबुली तोमर कुटूंबीयांनी दिली.

सुरूवातीला हे दोघेही पळून गेले असल्याची शक्यता वर्तवली जात होती. मात्र दोघांनाही पळून जाताना कोणी पाहिले नसल्याने राधेश्यामच्या वडिलांचा संशय बळावला. ज्यानंतर या हत्येचा उलघडा झाला. हत्येची कबुली दिल्यानंतर पोलिसांनी दोन्हीही मृतदेह ताब्यात घेतले आहेत. तसेच या घटनेचा अधिक तपास करत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Fact Check : आधार कार्ड दाखवून ३ लाखांचे कर्ज, सरकारच्या अधिकृत स्पष्टीकरणाने उडाली खळबळ

Maharashtra News Live Update: एमपीएससी पेपर फुटी प्रकरणात मुंबई पोलिसांकडनं तपासाला गती

Gold Rate Today: रक्षाबंधनाला सोनं खरेदीची सुवर्णसंधी, 10 तोळा सोनं 31600 रुपयांनी स्वस्त; वाचा 18k- 22k आणि 24k चे दर

EPFO Update : नोकरी करणाऱ्या पती-पत्नींसाठी महत्त्वाची बातमी! लग्नानंतर EPFO खात्या संबंधित 'हे' एक काम करायला विसरलात? नंतर होईल गोंधळ

Amaal Mallik Break: 'तूर्तास आपली रजा घेतो...'; प्रसिद्ध संगीतकाराचा चित्रपटसृष्टीला रामराम, कारण सांगत म्हणाला...

SCROLL FOR NEXT