धक्कादायक! कोरोनाला घाबरून दांपत्याची आत्महत्या Saam Tv
देश विदेश

धक्कादायक! कोरोनाला घाबरून दांपत्याची आत्महत्या

कोरोनाच्या भीतीने काही लोक चिंतेत आहेत. एका 40 वर्षाच्या व्यक्तीने आणि त्याच्या पत्नीने कोरोनाची लक्षणे दिसताच भीतीने आत्महत्या केली आहे.

वृत्तसंस्था

बंगळुरू : कोरोनाची दुसरी Corona Second Wave लाट अजूनही आटोक्यात आलेली नाही, एक धक्कादायक घटना समोर आली आहे. कोरोनाच्या भीतीने काही लोक चिंतेत आहेत. एका 40 वर्षाच्या व्यक्तीने आणि त्याच्या पत्नीने कोरोनाची लक्षणे दिसताच भीतीने आत्महत्या Suicide केली आहे. माहितीनुसार, ही घटना कर्नाटकातील आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आत्महत्या करण्याआधी पोलिसांना एक व्हॉईस मेसेजही Voice Message या दाम्पत्याने पाठवला होता.

हे देखील पहा-

या जोडप्याची ओळख रमेश आणि गुना आर सुवर्णा अशी पटली आहे. अशी पोलिसांनी माहिती दिली आहे. ते मंगळुरुमधील अपार्टमेंटमध्ये राहत होते तसेच समोर आलेल्या माहितीनुसार, दोघांमध्येही काही दिवसांपासून कोरोनाची लक्षणं दिसत होती.

या मेसेजमध्ये दाम्प्त्यानं म्हटलं होतं, की मीडियामध्ये कोरोना व्हायरसंदर्भात येणाऱ्या बातम्यांमुळे ते घाबरले आहेत. यामुळे ते आपले जीवन संपवत आहेत. यानंतर पोलीस कमिशनर यांनी या जोडप्याला कोणतेही चुकीचे पाऊल न उचलण्याचा सल्लाही दिला होता.

माहिती आहे की, पोलीस जोपर्यंत या जोडप्याच्या अपार्टमेंटमध्ये पोहोचले तोपर्यंत त्या जोडप्याने आत्महत्या केली होती. त्यांच्या या अपार्टमेंटमध्ये आत्महत्या केलेल्या महिलेने लिहिलेली एक सुसाईड नोट मिळाली आहे. या नोटमध्ये तिने आपल्या तेरा दिवसांच्या बाळाच्या मृत्यूबद्दलही लिहिले होते. ती या कारणामुळे दुःखी असल्याचे सांगितले होते.

Edited By-Sanika Gade

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Nanded: साखरझोपेत आभाळ फाटलं; ६ गावांना पुराचा वेढा, ४०-५० म्हशींचा मृत्यू, थराराक VIDEO

Balasaheb Thorat : काही शक्तींकडून संगमनेरची संस्कृती बिघडवण्याचे काम; बाळासाहेब थोरात यांची प्रतिक्रिया

Maharashtra Live News Update: महाराष्ट्र-तेलंगनाचा संपर्क तुटला; सीमेवरील पोडसा पूल पाण्याखाली

TET Exam Result: महत्त्वाची बातमी! आज टीईटी परीक्षेचा निकाल| VIDEO

इंग्लडचं मैदान गाजवलं, पण आशिया कपमधून गिलला मिळणार डच्चू? अजित आगरकरांच्या मनात नेमकं काय?

SCROLL FOR NEXT