Corona Latest Update in Marathi News SAAM TV
देश विदेश

Corona News Update: देशावर पुन्हा कोरोनाचं संकट; 'या' २ राज्यांचे टेन्शन वाढले

कोरोनाचा संसर्ग झपाट्याने वाढत असून, महाराष्ट्र आणि दिल्लीची चिंता वाढली आहे.

Nandkumar Joshi

नवी दिल्ली: कोरोनाची तिसरी लाट ओसरल्यानंतर कमी झालेली दैनंदिन रुग्णसंख्या पुन्हा हळूहळू वाढू लागली आहे. कोरोना विषाणूचा विळखा पुन्हा घट्ट होऊ लागला आहे. गेल्या २४ तासांत देशात कोरोनाचे (Covid 19) २७४५ नवीन रुग्ण आढळून आले आहेत. तर सहा जणांचा मृत्यू झाला आहे. कालच्या तुलनेत रुग्णसंख्या ४०७ ने वाढली आहे. मंगळवारी २३३८ नवीन कोरोनाबाधित आढळले होते. सक्रिय रुग्णांची संख्या १८ हजारांच्या पार पोहोचली आहे. दैनंदिन पॉझिटिव्हीटी रेट ०.६ टक्के आहे. वाढत्या कोरोना रुग्णसंख्येमुळे महाराष्ट्रासह दिल्लीची चिंता वाढली आहे. या दोन्ही राज्यांत कोरोनाचा संसर्ग वेगाने वाढू लागला आहे. (Corona Update in India)

देशात कोविड १९ च्या सक्रिय रुग्णांची संख्या वाढून १८,३८६ इतकी झाली आहे. ती एकूण कोरोनाबाधितांच्या ०.०४ टक्के आहे. रुग्ण बरे होण्याचे एकूण प्रमाण ९८.७४ टक्के आहे.

महाराष्ट्रात कोरोना रुग्ण वाढताहेत

महाराष्ट्रात (Maharashtra) मंगळवारी दैनंदिन कोरोना रुग्णसंख्या ७११ इतकी नोंदवली गेली. तर एका रुग्णाचा मृत्यू झाला. गुजरातमध्ये ४५ नवीन कोरोनाबाधितांची नोंद झाली. रुग्णाच्या मृत्यूची नोंद झाली नाही. तामिळनाडूमध्ये कोरोनाचे ९८ नवीन रुग्ण आढळले. त्यात अमेरिका आणि केरळमधून परतलेल्या दोघांचा समावेश आहे. (Maharashtra Corona)

दिल्ली चिंतेत

दिल्लीत (Delhi Corona) गेल्या २४ तासांत कोरोनाची दैनंदिन रुग्णसंख्या ३७३ इतकी नोंदवली गेली. तर एका रुग्णाचा मृत्यू झाला. कोरोना संसर्ग दर २.१५ टक्के इतका आहे. आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, देशाची राजधानी दिल्लीत एकूण कोरोना रुग्णांची संख्या १९,०६,८९६ इतकी झाली आहे. तर एकूण मृत्यू २६२१० झाले आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'तुम्हाला तात्या विंचू येऊन चावेल'; मोदीभक्त महेश कोठारेंना राऊतांचा टोला

किती गोंडस ती! रणवीर-दीपिका पादुकोणने पहिल्यांदा दाखवला मुलगी दुआचा चेहरा

Shocking : सुतळी बॉम्ब फोडताना घात झाला, एका चुकीमुळे तरुणाचा जीव गेला, ऐन दिवाळीत कुटुंबीयांच्या डोळ्यात पाणी

Raigad Politics: रायगडमधील राजकारणात मोठी उलथापालथ; राष्ट्रवादीचा नेता फुटला;भरत गोगावलेंनी खेळला मोठा डाव

दिवाळीत बोनसऐवजी दिली सोनपापडी; कामगार भडकले, कंपनीच्या गेटवरच डबे फेकले, Video Viral

SCROLL FOR NEXT