रडू नका नाही तर... अश्रूंमधूनही पसरू शकतो कोरोनाव्हायरस Saam Tv
देश विदेश

रडू नका नाही तर... अश्रूंमधूनही पसरू शकतो कोरोनाव्हायरस

कोरोना रुग्णांच्या डोळ्यामधून पाण्यातही देखील कोरोनाव्हायरसचे अस्तित्व आढळले आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

चंदीगड : शिंकण्याने, खोकण्याने कोरोनाव्हायरस Coronavirus पसरतो हे तर आपल्या सर्वांना माहिती आहे. म्हणूनच आपण प्रत्येकजण चेहऱ्यावर मास्क Mask लावून फिरत आहोत. पण आता तर डोळ्यामधील अश्रूंमधूनही कोरोनाचा Corona संसर्ग होऊ शकतो, अशी धक्कादायक माहिती संशोधनामधून research समोर आली आहे.

अमृतसर Amritsar येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाने केलेल्या या संशोधनानुसार, कोविड Covid-१९ ची लागण झालेल्या रुग्णांच्या अश्रू द्वारे कोरोना विषाणूचा संसर्ग होऊ शकतो. डोळ्यांमधून वाहणाऱ्या अश्रूंमध्ये सार्स -कोव्ह- २ चे अस्तित्व आढळलेले आहे. अर्थातच कोरोना विषाणूचा प्रार्दुभाव होण्याचा मुख्य स्रोत हा म्हणजे शिंकणे, खोकणे यामधून उडणारे द्रव बिंदूच आहे.

हे देखील पहा-

एखाद्या आजाराने कधीकधी ऑक्युलर मॅनिफेस्टेशन अर्थात डोळ्यांना देखील त्याचा त्रास होतो. उदाहरणार्थ, ताप, सर्दी झाली असेल तर डोळे जळजळ करत असतात. डोळ्यामधून पाणी येतं आले. अशी लक्षणे दिसणाऱ्या रुग्णांच्या डोळ्यांद्वारे वाहणाऱ्या पाण्यात देखील कोरोना विषाणू असतात. यामुळे त्याद्वारे देखील संसर्ग पसरू शकतो, असा निष्कर्ष या अभ्यासामध्ये मांडण्यात आला आहे.

१२० कोविड-१९ ग्रस्त रूग्णांच्या अभ्यास केल्यानंतर हा निष्कर्ष नोंदवण्यात आला आहे. १२० रुग्णांपैकी ६० जणांना ऑक्युलर मॅनिफेस्टेशन म्हणजेच डोळ्यांचे विविध त्रास झाले. तर ६० जणांना असा कोणताही प्रकार किंवा काहीही झाले नाही. ४१ रुग्णांमध्ये नेत्रपटलाचा हायपरिमिया तर ३८ रुग्णांमध्ये फॉलिक्युलर रिअॅक्शन्स आणि ३५ जणांमध्ये मध्ये केमोसिस व २० रुग्णांमध्ये म्यूकोइड डिस्चार्ज आणि ११ रुग्णांना डोळ्यांना खाज येण्याचा त्रास होत असलेले आढळले आहे.

डोळ्याच्या त्रासाची लक्षणे आढळलेल्या सुमारे ३७ टक्के रुग्णांना कोविड-१९ ची लागण झाली होती. तर उर्वरित ६३ टक्के लोकांना गंभीर स्वरूपाचा संसर्ग झालेला होता, असे या अहवालात नमूद करण्यात आले आहे. दुसऱ्या सेटमध्ये, सुमारे ५२ टक्के रुग्णांना मध्यम स्वरूपाचा आजार होता. तर ४८ टक्क्यांपेक्षा जास्त लोकांना गंभीर स्वरूपाचा संसर्ग झालेला होता.

यावरून १७.५ टक्के रुग्णांमध्ये आरटी-पीसीआर चाचणी मध्ये अश्रूंचे नमुने तपासण्यात आले होते. तेव्हा त्यांना कोविड -१९ झाल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यापैकी ९.१६ टक्के म्हणजेच ११ रूग्णांना डोळ्यांचे त्रास जाणवत होते. तर ८.३३ टक्के म्हणजेच १० रुग्णांना असा कोणत्याही प्रकारचा त्रास झाला नाही.

यावरून कोरोना विषाणूचा संसर्ग झालेले रुग्ण डोळ्याचा कोणताही विकार नसताना देखील डोळ्यामधून येणाऱ्या अश्रूंच्या माध्यमातून या विषाणूचा संसर्ग पसरवू शकतात हे स्पष्ट झाल्याचे या अभ्यासाच्या अहवालात नमूद करण्यात आले आहे. यामुळे नेत्र रोग तज्ज्ञांनी अधिक काळजी घेणे आवश्यक आहे. रुग्णांची तपासणी करताना रुग्णांपासून सुरक्षित अंतर ठेवणे आवश्यक आहे.

Edited By- Digambar Jadhav

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Madhuri Elephant : माधुरी हत्तीणीवरून राजकारण पेटलं; राजू शेट्टींचं जुनं पत्र व्हायरल, पत्रात नेमकं काय लिहिलं?

Nashik News : ईडीचा माजी आयुक्ताला दणका; कोट्यवधींची मालमत्ता जप्त, एका कृत्याने संशय बळावला

Maharashtra Politics: सांगलीत राष्ट्रवादीचा बुरूज ढासळला, जयंत पाटलांचे विश्वासू भाजपात; मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत हाती घेतलं 'कमळ'

Rakshabandhan 2025: रक्षाबंधनात ओवाळणीच्या ताटात कोणत्या गोष्टी ठेवणे शुभ मानले जाते?

ITBP Bus Accident: धक्कादायक! जवानांची बस नदीत कोसळली, क्षणात झालं होत्याचं नव्हतं|VIDEO

SCROLL FOR NEXT