Omicron BF.7 Variant SAAM TV
देश विदेश

Corona Virus : कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटने चिंता वाढवली; ही लक्षणे दिसताच वेळीच सावध व्हा!

Omicron च्या BF.7 या नवीन उप-प्रकाराने भारतासह जगभरातील देशांची चिंता वाढवली आहे.

साम टिव्ही ब्युरो

Corona New Variant : भारतात कोरोनाव्हायरस (COVID-19) संसर्गाच्या ताज्या प्रकरणांमध्ये सातत्याने घट होत आहे. गेल्या 24 तासांत देशात 2060 नवीन रुग्णांची नोंद झाली आहे. मात्र, एकीकडे कोरोना रुग्णवाढीपासून दिलासा मिळत असताना, दुसरीकडे Omicron च्या BF.7 या नवीन उप-प्रकाराने भारतासह जगभरातील देशांची चिंता वाढवली आहे. (Corona Latest News)

गुजरात बायोटेक्नॉलॉजी रिसर्च सेंटरने देशात कोरोनाच्या BF.7 प्रकाराचे पहिले प्रकरण शोधून काढले आहे. हा प्रकार अत्यंत सांसर्गिक असल्याचे मानले जात आहे. यात चिंतेची बाब म्हणजे अधिक हा नवीन व्हेरिअंट लोकांमध्ये वेगाने पसरत आहे. या व्हेरिएंटला XBB असे नाव देण्यात आले आहे.

ओमिक्रॉनचा हा BF.7 प्रकार प्रथम मंगोलियामध्ये उदयास आला होता. आता तो अनेक देशांमध्ये पसरला असून नवीन धोका निर्माण झाला आहे. चीनमध्ये कोरोनाची प्रकरणे वाढण्यासाठी या प्रकारालाही जबाबदार धरले जात आहे.

याशिवाय हा प्रकार अमेरिका, यूके, ऑस्ट्रेलिया आणि बेल्जियममध्येही वेगाने पसरत आहे. भारतात देखील नव्या या नवीन व्हेरिअंटची 50 हून अधिक लोकांना लागण झाल्याची माहिती समोर आली आहे. सिंगापूरमध्ये देखील या नवीन प्रकरणांमध्ये वाढ होत असल्याचे सांगण्यात येत आहे.

ही लक्षणे दिसताच वेळीच सावध व्हा!

दरम्यान, भारतातही या व्हेरिएंटची झपाट्याने रुग्ण आढळून येत असल्याने आरोग्य प्रशासनाने नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन केले आहे. नागरिकांना सतत खोकला, ऐकण्यात अडचण, छातीत दुखणे तसेच कंपन होणे अशी लक्षणे आढळून आल्यास त्याकडे दुर्लक्ष करू नये असं सांगण्यात आलंय.

Edited By - Satish Daud

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: पुण्यात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे आंदोलन; वाढत्या प्रदूषणास कारणीभूत व्यवस्थेचा विरोध करण्यासाठी आंदोलन

Malad Tourism: गुलाबी थंडी अगदी जवळच फिरायला जायचंय? मग मालाडमधील या जागा ठरतील बेस्ट ऑप्शन

Secret Santa Gifts : लाडक्या मित्रांसाठी 'सिक्रेट सांता' गिफ्ट्स, 500 रुपयांच्या आता युनिक भेटवस्तू

Pune News: पुण्यातील आदिवासी पाड्यात पहिल्यांदाच प्रकाश, ४० वर्षानंतर वीज पोहचली

आमदार सुनील शेळकेंच्या कुटुंबीयांवर जमिनीत उत्खननाचा आरोप, काकडेंकडून कारवाईची मागणी

SCROLL FOR NEXT