India Corona Update, Covid 19 Lates News, Covid Cases In India, Coronavirus Live Update Saam Tv
देश विदेश

India Coronavirus Update: कोरोनाची चौथी लाट येणार नाही? 'या' तारखेपासून कोरोनाचे रुग्ण होतील कमी! तज्ज्ञांनी केला मोठा दावा

Coronavirus Latest News : कोरोनाची चौथी लाट येणार नाही? तज्ज्ञांनी केला मोठा दावा

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Covid-19 In India:  भारतात पुन्हा एकदा कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होताना दिसत आहे. यामुळे लोकांच्या मनात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. याआधी आलेल्या कोरोनाच्या तीन लाटेमुळे भारतातील लोकांच्या जीवनात मोठी उलथापालथ घडवून आली होती.

यामध्ये अनेक लोकांना आपले प्राण ही गमवावे लागले होते. अशातच पुन्हा एकदा रुग्ण संख्या वाढत असल्याने अनेकांच्या मनात कोरोनाची चौथी लाट येणार का? अशी दहशत निर्माण झाली आहे. याचदरम्यान तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, लोकांनी घाबरून न जाता कोरोनाच्या वाढत्या कारणांबाबत काळजी घेण्याची गरज आहे. (Coronavirus Fourth Wave in India)

Coronavirus Fourth Wave in India : 'एप्रिलच्या दुसऱ्या आठवड्यापासून कोरोनाच्या रुग्णांमध्ये घट होणार'

कोरोना प्रकरणांमध्ये होत असलेली सध्याची वाढ ही नवीन लाटेचे लक्षण नाही, असं तज्ज्ञांचे म्हणणे. त्यांचं म्हणणं आहे की, कोरोनाचे ही प्रकरणे काही दिवसात कमी होऊ शकतो. कदाचित एप्रिलच्या दुसऱ्या आठवड्यापासून कोरोनाच्या रुग्णांमध्ये घट होण्यास सुरुवात होऊ शकते. (Latest Marathi News)

Coronavirus Fourth Wave in India : या लोकांनी घ्यायला हवी अधिक काळजी

जे लोक आधीपासूनच आधीच काही गंभीर आजाराने ग्रस्त आहेत किंवा जे वृद्ध रुग्ण आहेत, त्यांनी स्वतःची अधिक काळजी घेणं गरजेचं असल्याचं तज्ज्ञांचं म्हणणं आहे. अशा लोकांना संसर्ग होण्याचा धोका जास्त असतो. तज्ज्ञांनी स्पष्ट केले की, कोविड प्रकरणांमध्ये सध्याची वाढ मागील तीन लाटेपेक्षा वेगळी आहे.

तज्ञांच्या म्हणण्यानुसार, व्हायरसचा पॅटर्न 3 महिन्यांपूर्वी होता तसाच आहे. त्यानंतरही केसेस त्याच प्रकारे वाढत होत्या. यावेळी इन्फ्लूएंझाच्या भीतीमुळे लोक रुग्णालयात जात आहेत आणि त्यादरम्यान त्यांची कोरोना चाचणी केली जात आहे. त्यामुळेच कोरोनाची आणखी प्रकरणे समोर येत आहेत.

Coronavirus Fourth Wave in India : 15-20 दिवसांत रुग्ण संख्या आखि वाढेल

कोविड तज्ज्ञांचं म्हणणे आहे की, मागील कोरोना लाटेमधील विषाणूच्या नमुन्यांमधील फरक समजून घेणे महत्वाचे आहे. कारण ते आम्हाला व्हायरस संसर्ग रोखण्यासाठी उपाययोजना करण्यात मदत करू शकतात. मागील ट्रेंडनुसार पुढील 15-20 दिवसांत कोरोना प्रकरणांमध्ये वाढ होऊ शकते. यानंतर पुन्हा रुग्ण संख्या कमी होण्यास सुरुवात होईल. त्यांचं म्हणणं आहे की, कोविड प्रकरणांची संख्या वाढत आहे, परंतु त्याची गती मंद आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

मोठी बातमी! ८-९ जुलैला राज्यातील कोणतीही शाळा बंद नाही, शिक्षण विभागाने काढले आदेश

IND vs ENG : भारताचं खातं उघडलं, इंग्लंडचं गर्वहरण, मालिकेत बरोबरी; शुभमन गिलच्या यंग ब्रिगेडनं करुन दाखवलं

Monday Horoscope : बोलण्यापेक्षा कृतींवर लक्ष द्या; 'या' राशींच्या लोकांची भरभराट होणार

मस्क यांचा नवा पक्ष 'अमेरिका पार्टी', उद्योगपती मस्कही उतरणार राजकारणात; ट्रम्प यांच्या वादानंतर मस्क यांचा मोठा निर्णय

Ind Vs Eng 2nd Test : इंग्लंडचा अभेद्य किल्ला भेदला, ५८ वर्षांनी वनवास संपवला; गिलसेनेने बर्मिंगहॅममध्ये इतिहास रचला

SCROLL FOR NEXT