Corona New Variant Saam Digital
देश विदेश

Corona New Variant : युरोपमध्ये कोरोनाच्या नवीन व्हेरिएंटचा धुमाकूळ, भारताला किती धोका?

Sandeep Gawade

जगभरात कोरोनाच्या विविध व्हेरिएंट्सनी आतापर्यंत धुमाकूळ घातला होता. जग आताकुठेतरी या महामारीतून रावरलं आहे. मात्र आता कोरोनाच्या नवीन व्हेरिएंटने चिंता वाढवली आहे. जून महिन्यात जर्मनीमध्ये प्रथम आढळलेला XEC व्हेरिएंट आता युरोपसह इतर देशांमध्येही वेगाने पसरत आहे. आतापर्यंत १३ हून अधिक देशांमध्ये XEC ची अनेक प्रकरणे नोंद झाली आहे. XEC व्हेरिएंट ओमिक्रॉनचे दोन सब-व्हेरिएंट्स KS.1.1 आणि KP.3.3 यांच्या मिश्रणातून तयार झाल्याचं वैद्यकीय तज्ज्ञांचं म्हणणं असून संसर्ग वाढण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

XEC व्हेरिएंट काय आहे?

XEC व्हेरिएंट ओमिक्रॉनच्या दोन सब-व्हेरिएंट्स KS.1.1 आणि KP.3.3 यांच्या संकरातून निर्माण झाला आहे. KS.1.1 म्हणजे FLiRT व्हेरिएंट, यातून कोरोनाची प्रकरणे अधिक वाढत गेली. या दोन सब-व्हेरिएंट्सच्या मिश्रणामुळे XEC अधिक संक्रामक असल्याचे समजले जात आहे. तज्ज्ञांच्या मते, या व्हेरिएंटमध्ये काही विशिष्ट म्युटेशन्स आहेत, ज्यामुळे तो विद्यमान लसींविरुद्ध प्रतिकारशक्ती निर्माण करू शकतो. हा अधिक धोकादायक ठरू शकतो कारण यामुळे लोकांना गंभीर आजार होण्याची शक्यता आहे.

XEC व्हेरिएंट किती धोकादायक आहे?

सध्या XEC व्हेरिएंट किती धोकादायक आहे, याबद्दल अजून सविस्तर माहिती उपलब्ध नाही. तथापि, युरोप आणि उत्तर अमेरिकेत वाढणारी प्रकरणे पाहता, वैज्ञानिकांनी चिंता व्यक्त केली आहे. जर हा व्हेरिएंट अधिक वेगाने पसरू लागला, तर त्याचे परिणाम गंभीर असू शकतात. या व्हेरिएंटचे लक्षणे फ्लूसारखी असल्यामुळे लोक याकडे दुर्लक्ष करू शकतात. त्यामुळे, हा अधिक लोकांमध्ये पसरून गंभीर परिणाम घडवू शकतो.

XEC च्या लक्षणे आणि परिणाम

UK NHS च्या माहितीनुसार, XEC व्हेरिएंटची लक्षण साधारण फ्लूसारखी आहेत. रुग्णाला ताप, थंडी वाजणे, सतत खोकला येणे, श्वास घेण्यास त्रास होणे, थकवा, अंगदुखी, आणि भूक मंदावणे या सारखी लक्षणे जाणवू शकतात. बहुतेक रुग्ण एक ते दोन आठवड्यांत बरे होतात, परंतु काहींना जास्त काळ लागतो. काही गंभीर प्रकरणांमध्ये रुग्णांना रुग्णालयात दाखल होण्याची आवश्यकता असू शकते. यामुळे आरोग्य यंत्रणांवर मोठा ताण येण्याची शक्यता आहे.

XEC व्हेरिएंटपासून बचाव कसा करावा?

नागरिकांनी लसीकरणावर अधिक भर द्यायला हवा. लसीकरण हेच या विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी प्रभावी साधन आहे. त्याशिवाय पूर्वीचे कोविड प्रतिबंधात्मक उपायदेखील पाळणे आवश्यक आहे. गर्दीत मास्क घालणे, सामाजिक अंतर राखणे, स्वच्छतेची काळजी घेणे हे आवश्यक उपाय आहेत. जर हा व्हेरिएंट सध्याच्या लसींविरुद्ध प्रतिकार निर्माण करत असेल, तर लसीकरणासोबतच वैयक्तिक काळजी घेणे अधिक महत्त्वाचे ठरते.

सध्या, युरोप आणि उत्तर अमेरिकेत या व्हेरिएंटमुळे काही प्रकरणे नोंदवली जात असली तरी, आशियातील देशांमध्ये देखील सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. सध्यातरी भारतात या व्हेरिएंटचे रुग्ण आढळलेला नाही. पण युरोपीय देशांमध्ये जाणाऱ्या भारतीय नागरिकांनी अधिक काळजी घेण्याची गरज आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Updates : पुण्यातील पेठ परिसरात मुसळधार पावसाची हजेरी

Nashik Crime : पतीच्या लटकत्या मृतदेहाखाली पत्नीची दुर्गापूजा? 'त्या' दिवशी नेमकं काय घडलं? पाहा VIDEO

Maharahstra Politics: रश्मी ठाकरे भावी मुख्यमंत्री; मातोश्रीच्या परिसराबाहेरील बॅनरमुळे चर्चांना उधाण

Chess Olympiad: भारत बनला चॅम्पियन; पुरुष आणि महिला गटात सुवर्णपदक जिंकत रचला इतिहास

Mumbra building slab collapse : मुंब्र्यात इमारतीचा स्लॅब कोसळला, ५ वर्षीय मुलीचा मृत्यू

SCROLL FOR NEXT