India Corona Update
India Corona Update Saam Tv
देश विदेश

Corona Virus News: धास्ती वाढली! 24 तासांत देशामध्ये 5,880 नव्या रुग्णांची नोंद; सक्रीय रुग्णसंख्या 35 हजार पार

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Delhi News: देशावर पुन्हा एकदा कोरोनाचे सावट असून कोरोनाचा (Corona Virus) प्रसार वेगाने होत आहे. देशभरामध्ये कोरोना रुग्णांची (Corona Patient) संख्या वाढच चालली असून दररोज धडकी भरवणारी आकडेवाडी समोर येत आहे. गेल्या 24 तासांत देशामध्ये 5,880 नवीन कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. कोरोना रुग्णांच्या वाढत्या संख्येमुळे केंद्र सरकारसोबत (Central Government) राज्य सरकारांच्या चिंतेत वाढ झाली आहे. अशामध्ये सरकारकडून आवश्यक ती पाऊलं उचलली जात आहेत.

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने जारी केलेल्या माहितीनुसार, रविवारी गेल्या 24 तासांमध्ये देशामध्ये कोरोनाचे 5,880 नवीन रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे देशातील सक्रीय कोरोना रुग्णांच्या आकड्यात वाढ होत तो 35,199 वर पोहचला आहे.

तर शनिवारी देशामध्ये 6,155 नव्या रुग्णांची नोंद झाली होती. कोरोनाची वाढती प्रकरण लक्षात घेता केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने देशभरातील सर्व रुग्णालयांमध्ये मॉक ड्रिल करण्याचे आदेश दिले. त्यानुसार आजपासून देशभरातील रुग्णालयात मॉक ड्रिल सुरु आहे.

महाराष्ट्रामध्ये देखील कोरोना वेगाने वाढत आहे. महाराष्ट्रात रविवारी कोरोनाच्या 788 नव्या रुग्णांची नोंद झाली. तर एका कोरोना रुग्णाचा मृत्यू झाला. आरोग्य विभागाने दिलेल्या आकडेवारीनुसार, महाराष्ट्रात आतापर्यंत एकूण 81,49,929 लोकांना कोरोनाची लागण झाल्याची झाली आहे. तर आतापर्यंत एकूण 1,48,459 लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

दरम्यान, कोरोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता हरियाणा, केरळ आणि पुडुचेरी या राज्यांमध्ये पुन्हा मास्कची सक्ती करण्यात आली आहे. या राज्यांमध्ये सार्वजनिक ठिकाणी वयोवृद्ध, आजारी व्यक्ती आणि गरोदर महिलांना मास्क सक्ती केली आहे. हॉस्पिटल्स, हॉटेल्स, रेस्टॉरंट्स, दारूची दुकानं, मनोरंजन क्षेत्र, सरकारी कार्यालय आणि व्यावसायिक कार्यालयांमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना मास्क घालणे अनिवार्य केले आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Chhaya Kadam : कान्स फेस्टिव्हलसाठी मराठमोळ्या छाया कदमचा हटके अंदाज

Maharashtra Lok Sabha Voting Live: भाजप मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांची निवडणूक आयोगाकडे तक्रार

Pune Porsche Car Accident Case: हिट अ‍ॅण्ड रन प्रकरणात माझा संबंध नाही; आरोपानंतर आमदार सुनिल टिंगरेंचा स्पष्टीकरण

Worli Loksabha Election: मतदान ड्युटी करताना पोलिंग एजंट मनोहर नलगे यांचा मृत्यू

Special Report | उद्धव ठाकरेंचं पहिल्यांदा पंजाला तर राज ठाकरेंचं 19 वर्षांनी धनुष्यबाणाला मत

SCROLL FOR NEXT