Corona Vaccine Saam Tv
देश विदेश

Corona Vaccine: लवकरच लहान मुलांनाही कोरोना लस दिली जाणार, Corbevax च्या आपत्कालीन वापरासाठी DCGI ची शिफारस

12 ते 18 वर्षे वयोगटातील मुले आणि किशोरवयीन मुलांसाठी आपत्कालीन वापरासाठी Corbevax ची शिफारस केली आहे.

वृत्तसंस्था

नवी दिल्ली: भारताच्या बायोलॉजिकल ई द्वारे निर्मित कॉर्बेवॅक्स (Corbevax) ही लस 12 ते 18 वर्षे वयोगटातील मुले आणि किशोरवयीन मुलांसाठी काही अटींसह आपत्कालीन वापरासाठी शिफारस केली आहे. ड्रग कंट्रोलर जनरल ऑफ इंडिया (DCGI) च्या विषय तज्ञ समितीने ही शिफारस केली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, DCGI च्या विषय तज्ञ समितीने 12 ते 18 वर्षे वयोगटातील मुले आणि किशोरवयीन मुलांसाठी आपत्कालीन वापरासाठी Corbevax ची शिफारस केली आहे.

15 वर्षांखालील मुलांच्या लसीकरणाबाबत (Vaccination) सरकारने अद्याप कुठलाही निर्णय घेतलेला नाही, असे सूत्रांनी सांगितले. निती आयोगाचे सदस्य वीके पॉल यांनी नुकत्याच झालेल्या पत्रकार परिषदेत सांगितले होते की, लसीकरणाची अतिरिक्त गरज आणि त्यासाठी अधिक लोकसंख्येचा नियमितपणे आढावा घेतला जात आहे.

ड्रग्ज कंट्रोलर जनरल ऑफ इंडिया (DCGI) ने 28 डिसेंबरला आपत्कालीन परिस्थितीसाठी कॉर्बेवॅक्सला मर्यादित आधारावर वापराची मान्यता दिली आहे. मात्र, देशातील लसीकरण मोहिमेत (Corona Vaccine Drive) या लसीचा समावेश करण्यात आलेला नाही.

CDSCO च्या COVID-19 वरील विषय तज्ञ समितीने अर्जावर चर्चा केली आणि 12 ते 18 वर्षांखालील वयोगटातील मुलांसाठी Corbevax चा वापराला काही अटींसह मंजुरी दिली जाऊ शकते अशी शक्यता वर्तवली आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली. ही शिफारस अंतिम मंजुरीसाठी डीसीजीआयकडे पाठवण्यात आल्याचंही सांगण्यात येत आहे.

Edited By - Nupur Uppal

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mumbai Local: मध्य रेल्वेला पावसाचा फटका, लोकलसेवा उशिराने; घराकडे निघालेल्या प्रवाशांचे हाल

थँक्स माय फ्रेंड! रशियाच्या पुतिन यांच्या फोननंतर PM मोदींनी मानले आभार, ट्रम्प काय म्हणाले सगळं काही सांगितलं!

Crime : कानशिलात लगावल्याने बायको भडकली, रागाच्या भरात नवऱ्याचा प्रायव्हेट पार्टच कापला

Maharashtra Rain Live News: अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर कल्याण-डोंबिवलीतील शाळांना उद्या सुट्टी

Woman Police : दारुच्या नशेत रिक्षाचालकाची मग्रुरी, महिला कॉन्स्टेबलला फरफटत नेलं, VIDEO

SCROLL FOR NEXT