India Corona Update Saam Tv
देश विदेश

India Corona Update: भारतात कोरोना आकडेवारीत किंचित वाढ; 24 तासात 30,757 नवीन रुग्ण

भारतात गेल्या एका दिवसात कोरोना विषाणूची 30,757 नवीन प्रकरणे नोंदवली गेली आहेत. त्यामुळे भारतात त्यानंतर एकूण संक्रमित रुग्णांची संख्या 4,27,54,315 वर पोहोचली.

वृत्तसंस्था

नवी दिल्ली : भारतात (India) गेल्या एका दिवसात कोरोना विषाणूची 30,757 नवीन केसेस नोंदवली गेली आहेत. त्यामुळे भारतात त्यानंतर एकूण संक्रमित रुग्णांची संख्या 4,27,54,315 वर पोहोचली. यासह, कोरोनातून (Corona) बरे होण्याचा दर पुन्हा एकदा 98 टक्क्यांहून अधिक झाला आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने (Ministry Of Health) गुरुवारी अपडेट केलेल्या आकडेवारीत ही माहिती समोर आली आहे. सकाळी 8 वाजेपर्यंतच्या आकडेवारीनुसार, गेल्या 24 तासांत आणखी 541 रुग्णांचा मृत्यू झाला असून, मृतांची संख्या 5,10,413 वर पोहोचली आहे. (India Corona Update Today)

दिलासादायक बातमी आहे की, देशात सलग 11 दिवसांत दररोज एक लाखापेक्षा कमी कोरोनामुळे झालेल्या संसर्गाची प्रकरणे नोंदवली गेली आहेत. आरोग्य मंत्रालयाने माहिती दिली की, उपचार घेत असलेल्या रुग्णांची संख्या 3,32,918 वर आली आहे. जी संसर्गाच्या एकूण प्रकरणांच्या 0.78 टक्के आहे. राष्ट्रीय स्तरावर कोविड-19 रुग्णांचा बरा होण्याचा दर 98.03 टक्के आहे. हा दर 98.01 टक्के नोंदवला गेला आहे, जो यावर्षी 5 जानेवारी रोजी 98 टक्के होता. गेल्या 24 तासांत उपचार घेत असलेल्या रुग्णांच्या संख्येत 37,322 ने घट झाली आहे.

मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, रोजचा संसर्ग दर 2.61 टक्के आहे. तर साप्ताहिक संसर्ग दर 3.04 टक्के आहे. देशात आतापर्यंत 4,19,10,984 लोक कोरोनातुन झाल्यानंतर बरे झाले आहेत. तर `कोरोनामुळे मृत्यूचे प्रमाण 1.19 टक्के नोंदवले गेले आहे. मंत्रालयाने सांगितले की, आतापर्यंत कोविड लसीचे (Corona Vaccination) 174.24 कोटीहून अधिक डोस देण्यात आले आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Dates Benefits: खजूर खाण्याचे हे ७ फायदे माहितीयेत का?

Mumbai Shocking : मुंबई हादरली ! १५ वर्षीय मुलीवर जन्मदात्या वडिलांकडून बलात्कार, आईचाही समावेश

Shravana 2025: श्रावणात शिवलिंग पूजा करताना 'या' ७ वस्तू टाळा, होऊ शकतो अपशकुन

Liver cirrhosis last stage: लिव्हर सिरोसिसच्या लास्ट स्टेजमध्ये शरीरात होतात 'हे' मोठे बदल; यकृत सडण्याची लक्षणं वेळीच ओळखा

HBD Ranveer Singh : रणवीर सिंहचं ५ सुपरहिट चित्रपट, पहिला सिनेमा कोणता?

SCROLL FOR NEXT