corona in India Omicron subvariant, Corona Virus Latest Marathi News, Covid News SAAM TV
देश विदेश

कोरोनाने टेन्शन वाढवलं! देशातील दैनंदिन रुग्णसंख्येत तब्बल ४१ टक्क्यांनी वाढ

देशात आजवर कोरोनाची एकूण 4,31,90,282 प्रकरणे नोंदवली गेली आहेत

साम टिव्ही ब्युरो

नवी दिल्ली: गेल्या काही दिवसांपासून देशभरात कोरोना (Corona) रुग्णांमध्ये सातत्याने वाढ होत आहे. त्यामुळे देशात कोरोनाची चौथी लाट येणार अशी शक्यता वर्तवली जात आहे.अशातच मंगळवारी देशभरात कोरोनाच्या नवीन रुग्णात लक्षणीय वाढ झाली. गेल्या 24 तासांत देशात कोरोनाचे तब्बल 5 हजार 233 नवीन रुग्ण आढळून आले आहेत. (Corona Virus Latest Update in India)

चिंताजनक बाब म्हणजे मंगळवारी देशात आढळून आलेली कोरोना रुग्णसंख्या मार्चनंतरची सर्वाधिक रुग्णसंख्या ठरली आहे. त्यामुळे आता देशात कोरोनाची लाट येणार असल्याची शक्यता तज्ञांकडून वर्तवण्यात आली आहे. 24 तासांत आढळून आलेली रुग्णसंख्या ही मागील तीन महिन्यांतील सर्वाधिक रुग्णसंख्या ठरली आहे.

आरोग्य मंत्रालयाने जाहीर केलेल्या ताज्या आकडेवारीनुसार, देशात मंगळवारी दिवसभरात कोरोनाची तब्बल 5 हजार 233 नवीन प्रकरणे नोंदवण्यात आली आहेत. सोमवारी ही रुग्णसंख्या 3 हजार 714 इतकी होती. मात्र आज त्यात तब्बल 41 टक्क्यांची वाढ झाली आहे. दरम्यान, गेल्या 24 तासांत कोरोनामुळे 7 जणांचा मृत्यू झाला आहे.

आजवर देशात कोरोनाची एकूण 4,31,90,282 प्रकरणे नोंदवली गेली आहेत. यापैकी एकूण 4,26,36,710 लोकांनी कोरोनावर यशस्वी मात केली.तर आतापर्यंत 5,24,715 लोकांना कोरोनामुळे आपला जीव गमवावा लागला.

राष्ट्रव्यापी लसीकरण कार्यक्रमांतर्गत, देशभरात 194.43 कोटी लसीचे डोस देण्यात आले आहेत. सध्या देशात कोरोनाच्या सक्रिय रुग्णांची संख्या 28 हजार 857 इतकी आहे. देशात कोरोना रुग्णांचा पॉझिटिव्हीटी दर 1.67 टक्के इतका आहे.

Edited By - Satish Daud

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sanjay Raut : शेकाप ही भाजपची 'बी' टीम; संजय राऊत यांची शेकाप उमेदवार टीका

Pune News: पुण्यामध्ये मतदानाच्या दिवशी PMPMLच्या वाहतुकीमध्ये बदल, असा कराल प्रवास

Maharashtra News Live Updates: सांगोल्यातील अपक्ष उमेदवारावर पाठिंब्यासाठी दबाव; निवडणूक निर्णय अधिकाऱ्याकडे तक्रार

Pune Crime : कपड्याच्या दुकानातून पावणे चार लाखांची रोकड लंपास; चोरटे सीसीटीव्हीत कैद

Women Qualities: महिलांच्या या सवयीचं पुरूषांकडून होतं कौतुक, जिंकतात हृदय

SCROLL FOR NEXT