Coronavirus in India Latest Update SAAM TV
देश विदेश

Corona Update in India: कोरोनाचा धोका वाढताच; ताजी आकडेवारी पाहा

मुंबई, महाराष्ट्रासह देशभरात कोरोना विषाणूचा फैलाव पुन्हा वेगाने वाढत आहे.

Nandkumar Joshi

नवी दिल्ली: देशात कोरोनाच्या दैनंदिन रुग्णसंख्येत वाढ होताना दिसत आहे. गेल्या २४ तासांत कोरोनाच्या (Corona) जवळपास चार हजार नव्या रुग्णांचे निदान झाले आहे. आदल्या दिवशीच, शुक्रवारी देशात कोरोनाचे चार हजारांहून अधिक रुग्ण आढळले होते. ८४ दिवसांनंतर पहिल्यांदाच कोरोनाच्या दैनंदिन रुग्णांची संख्या चार हजारांच्या वर गेली होती.

कालच्या तुलनेत कोरोनाच्या दैनंदिन रुग्णसंख्येत किंचित घट बघायला मिळाली. दैनंदिन रुग्ण चार हजारांपेक्षा कमी असले तरी, कोरोनाचा धोका मात्र कायम आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या आजच्या ताज्या आकडेवारीनुसार, शनिवारी सकाळी देशात कोरोनाचे ३९६२ नवीन रुग्ण नोंदवले गेले आहेत. कोरोनाच्या रुग्णसंख्येत सातत्याने होणारी वाढ बघता, सक्रिय रुग्णसंख्याही वाढत आहे. सक्रिय रुग्णांचा आकडा २२४१६ वर पोहोचला आहे. (Corona Update in India)

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या माहितीनुसार, भारतात एका दिवसात कोरोना विषाणूचे (Coronavirus) ३९६२ रुग्ण आढळले आहेत. देशात एकूण कोरोना रुग्णांची संख्या ४, ३१,७२,५४७ इतकी झाली आहे. तर कोरोनाचा संसर्ग झाल्याने गेल्या २४ तासांत २६ रुग्णांची जीव गमावला आहे. त्यामुळे एकूण मृतांची संख्या वाढून ती ५, २४, ६७७ इतकी झाली आहे. काल, शुक्रवारी प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीनुसार, २४ तासांत ४,०४१ नवीन रुग्ण आढळले होते. तर १० रुग्णांचा मृत्यू झाला होता.

सक्रिय रुग्ण २२ हजारांवर

कोरोना रुग्णांच्या संख्येत दिवसागणिक वाढ होत आहे. त्यामुळे सक्रिय रुग्णांची संख्या २२ हजारांहून अधिक झाली आहे. ताज्या अहवालानुसार, देशात कोविड १९ च्या उपचाराधीन रुग्णांची संख्या २१, १७७ वरून २२,४१६ इतकी झाली आहे. कालच्या तुलनेत अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या १२३९ ने वाढली आहे. तर देशात गेल्या २४ तासांत २६९७ रुग्ण बरे झाले असून, त्यांना घरी सोडण्यात आले आहे. बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ४,२६,२५,४५४ म्हणजेच ९८.७४ टक्के इतकी झाली आहे.

देशात पुन्हा कोरोना विषाणूने डोके वर काढले आहे. कोरोनाविरुद्धचा लढा आणखी तीव्र झाला आहे. कोरोना प्रतिबंधक लसीकरण मोहीम वेगाने राबवली जात आहे. गेल्या २४ तासांत ११,६७,०३७ डोस देण्यात आले आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Private Companies: ५ वर्षांत २ लाखांपेक्षा जास्त कंपन्या बंद, धक्कादायक आकडेवारी आली समोर; नेमकं कारण काय?

Maharashtra Live News Update: शेतकरी, मजूर, वंचितांच्या हक्कांसाठी लढणारे व्यक्तिमत्व हरपले- अजित पवार

दहावीत ९७ टक्के, वर्गात पहिला; टॉपरने ट्रेनसमोर उडी घेत जीव दिला, मृतदेह पाहून आई बेशुद्ध पडली

Fact-Check: सरकारी कर्मचाऱ्यांच्या पगारात मोठा बदल? 8व्या वेतन आयोगात DA-बेसिक मर्ज होणार?

Shirur MlA Mauli Katke : शिरूरमध्ये आजी-माजी आमदार भिडले, मतदान केंद्राबाहेर जोरदार राडा, पाहा व्हिडिओ

SCROLL FOR NEXT