Corona In India, Corona news updates Saam Tv
देश विदेश

कोरोनाने चिंता वाढवली; 'अशी' आहे आजची ताजी स्थिती

देशात कोरोना संसर्ग दिवसेंदिवस वाढताना दिसून येत आहे.

वृत्तसंस्था

वृत्तसंस्था: देशात कोरोना संसर्ग दिवसेंदिवस वाढताना दिसून येत आहे. देशात गेल्या २४ तासांत २५४१ नवीन कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. तसेच दिवसभरात १७५५ रुग्णांनी कोरोनावर (corona) मात केली आहे. काल देशात कोरोनाचे २५२७ नवे कोरोनाबाधित रुग्ण तर ३३ रुग्णांचा मृत्यू झाला. सक्रिय प्रकरणांची संख्या १६५२२ वर पोहोचली आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने जारी केलेल्या आकडेवारीनुसार, देशातील सक्रिय रुग्णांची संख्या १५ हजार ८७३ इतकी झाली आहे. शनिवारी दिवसभरात देशात १८५५ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. (Corona news updates)

हे देखील पाहा-

भारतात कोरोनामुळे (corona) जीव गमावणाऱ्यांची संख्या ५ लाख २२ हजार १९३ इतकी झाली आहे. देशामध्ये आतापर्यंत ४ कोटी २५ लाख १९ हजार ४७९ रुग्ण कोरोना विषाणूच्या संसर्गातून बरे झाले आहेत. याबरोबरच देशात सध्याचा दैनंदिन कोरोना संसर्गाचा दर ०.०४ टक्क्यांवर पोहोचला आहे. देशव्यापी लसीकरणात आतापर्यंत १८७ कोटीपेक्षा जास्त कोरोना प्रतिबंधात्मक लसी देण्यात आले आहेत. शनिवारी दिवसभरामध्ये देशात १९ लाख १३ हजार २९६ कोरोना लसी देण्यात आले आहेत. भारतात आतापर्यंत १८७ कोटी ४६ लाख ७२ हजार ५३६ कोरोनाच्या लसी देण्यात आले आहेत.

दिल्लीत कोरोनाचा परिस्थिती

राष्ट्रीय राजधानीत गेल्या काही दिवसांपासून (Covid) कोविड-19 च्या रुग्णांमध्ये वाढ झाली आहे. गुरुवारी दिल्लीत (Delhi) संसर्गाची 965 नवीन प्रकरणे समोर आली. बुधवारी कोरोनाचे 1,009, मंगळवारी 632 आणि सोमवारी 501 रुग्ण आढळले आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Tharala Tar Mag! : "सगळे पुरावे खोटे..."; अर्जुननं कोर्टात बाजी पलटली, सायलीला निर्दोष सिद्ध करण्यासाठी लढवली अनोखी शक्कल| VIDEO

Maharashtra News Live Update : वाशिम शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या एकबुर्जी प्रकल्पाचा जलसाठा पोहोचला 35 टक्क्यांवर

Highway tyre puncture: हायवेवर टायर पंक्चर झाल्यास काय कराल?

Oral Health Tips: रोज फक्त 2 मिनिटांचा हा उपाय ठरू शकतो दातांसाठी फायदेशीर; डॉक्टरांनी सांगितल्या तोंडाच्या आरोग्याच्या महत्त्वाच्या सवयी

Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींच्या खात्यात ₹१५०० कधी येणार? ८ दिवसांत पैसे जमा होण्याची शक्यता, महत्त्वाची अपडेट समोर

SCROLL FOR NEXT