शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ६०० अंकांनी कोसळला

शेअर मार्केटमध्ये मोठी घसरण दिसून आली
Share Market, Share Market News Today, Sensex Today, Sensex Latest Updates
Share Market, Share Market News Today, Sensex Today, Sensex Latest UpdatesSaam Tv
Published On

वृत्तसंस्था: आठवड्याच्या शेवटीला शेअर मार्केटमध्ये मोठी घसरण दिसून आली. बीएसईचा निर्देशांक सेन्सेक्समध्ये ६०० अंकापेक्षा जास्त घसरण दिसून आली. निफ्टीदेखील १६९५० अंकाखाली घसरला आहे. तर, सेन्सेक्स ५७ हजार अंकाखाली आला आहे. शेअर मार्केटची (Share Market) सुरुवात घसरणीसह झाली. शेअर बाजाराच्या प्री-ओपनिंग सत्रात याचे संकेत दिसून आले. शुक्रवारी अमेरिकन शेअर बाजारात झालेली घसरण आणि आशियाई बाजारात असलेले नकारात्मक संकेताचा परिणाम शेअर मार्केटवर दिसून आला आहे. (Share Market News Today)

हे देखील पाहा-

आज शेअर मार्केटची (Share Market) सुरुवात सेन्सेक्समध्ये ४३९.५१ अंकाच्या घसरणी झाली. सेन्सेक्स (Sensex) ५६७५७.६४ अंकावर सुरू झाला. शुक्रवारी सेन्सेक्सचा निर्देशांक ५७१९७ अंकावर बंद झाला होता. तर, निफ्टीत १६२.९ अंकाची घसरण दिसून आली. निफ्टी १७००९.०५ अंकावर सुरू झाला. शुक्रवारी हा १७१७१ अंकावर बंद झाला होता.

Share Market, Share Market News Today, Sensex Today, Sensex Latest Updates
फर्निचरच्या वर्कशॉपमध्ये भीषण आग; वृद्धाचा होरपळून मृत्यू

शेअर मार्केटमध्ये आज व्यवहाराला सुरुवात झाल्यानंतर काही मिनिटांवर निफ्टीतील ५० पैकी ४५ शेअरमध्ये घसरण दिसून आली. फक्त ५ शेअरमध्ये तेजी दिसून येत होती. बँक निफ्टीमध्ये १४६ अंकांची घसरण दिसून आली. बँक निफ्टी ३५८९७ अंकांवर व्यवहार करत आहे. ऑटो क्षेत्र वगळता इतर सर्व क्षेत्रात घसरण होत असल्याचे दिसून आले आहे. सर्वाधिक शेअर रिअल्टी क्षेत्रात दिसून येत आहे. मेटल क्षेत्रात २.०८ टक्के, आयटी क्षेत्रात १.८० टक्के घसरण दिसून येत आहे.

Edited By- Digambar Jadhav

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com