कोरोनाच्या नव्या रूपाने चिंता वाढवली; या 7 देशांची दक्षिण आफ्रिकेतून प्रवासावर बंदी  Saam Tv
देश विदेश

कोरोनाच्या नव्या रूपाने चिंता वाढवली; या 7 देशांची दक्षिण आफ्रिकेतून प्रवासावर बंदी

दक्षिण आफ्रिका, बोट्स्वाना, हाँगकाँग आणि इस्राईलमध्ये आढळलेला ‘सार्स-सीओव्ही-2’चा ‘बी.1.1.529’ हा नवीन प्रकार वेगाने पसरणारा आणि चिंताजनक प्रकार आहे

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

वृत्तसंस्था : दक्षिण आफ्रिका, बोट्स्वाना, हाँगकाँग आणि इस्राईलमध्ये आढळलेला ‘सार्स-सीओव्ही-2’चा ‘बी.1.1.529’ हा नवीन प्रकार वेगाने पसरणारा आणि चिंताजनक प्रकार आहे, असे जागतिक आरोग्य संघटनेच्या (WHO) एका सल्लागार समितीने जाहीर करण्यात आले आहे. ग्रीक वर्णमालेनुसार विषाणूच्या या नव्या प्रकारामध्ये ओमीक्रोन हे नाव संघटनेने दिले आहे. कोरोनाच्या डेल्टा प्रकारामधील वर्गात हा नवा विषाणू संसर्ग अधिक वेगाने पसरत असल्यामुळे तो चिंताजनक आहे, असे ‘डब्लूएचओ’ने सांगितले आहे. नव्या विषाणूला अटकाव घालण्याकरिता अनेक देशांनी घातलेली प्रवास बंदी अन्यायकारक असल्याची टीका दक्षिण आफ्रिकेनं यावेळी केले आहे.

हे देखील पहा-

1. अमेरिका : ओमीक्रोनच्या भीतीने अमेरिका दक्षिण आफ्रिकेसह 7 देशामधील प्रवाशांवर सोमवारपासून बंदी घातली आहे. या देशांमधून अमेरिकेत येण्यास आणि अमेरिकेमधून तेथे जाण्यास सक्त मनाई घालण्यात आली असल्याचे अध्यक्ष जो बायडेन यांनी जाहीर केले आहे. अमेरिकी नागरिक आणि अमेरिकेचे कायमस्वरूपी नागरिकत्व असलेले आणि ज्यांची कोरोना चाचणी निगेटिव्ह आली आहे, त्यांना यामधून सूट देण्यात आली आहे. ‘हा विषाणू वेगाने फैलावत असून आपण दक्षता बाळगायला हवी, असे बायडेन यावेळी म्हणाले आहेत.

2. सौदी अरेबिया : द. आफ्रिका, नामीबिया, बोट्स्वाना, झिम्बाब्वे, लिसोथो आणि एस्वाटिनी आणि मोझांबिक या देशामधील विमान सेवा सौदी अरेबियाने बंद केली आहे.

3. पाकिस्तान : कोरोनाच्या नव्या व्हेरिअंटमुळे पाकिस्तानकडून हाँगकाँगसह 6 आफ्रिकन देशांच्या प्रवासावर बंदी घालण्यात आली आहे.

4. ऑस्ट्रेलिया : दक्षिण आफ्रिकेत 9 देशांमध्‍ये जाऊन आलेल्या विदेशी नागरिकांवर ऑस्ट्रेलियाने शनिवारी नवे निर्बंध लागू करण्यात आले आहेत. या देशांमधून परतणाऱ्या ऑस्ट्रेलियन नागरिक आणि त्यांच्यावर अवलंबून असणाऱ्यांना 14 दिवस विलगीकरणाची सक्ती लागू केली असल्याचे आरोग्य मंत्री ग्रेग हंट यांनी यावेळी सांगितले आहे.

5. ब्राझील : 6 दक्षिण आफ्रिकी देशांमधील प्रवाशाकरिता ब्राझील त्यांच्या सीमा बंद केले आहेत. अध्यक्ष बोल्सोनारो यांच्या प्रमुख उच्चाधिकाऱ्यांनी सांगितले आहे.

6. युरोपिय समुदाय (EU) : दक्षिण आफ्रिकेत प्रवाशांना युरोपिय देशांनी बंदी घातली आहे. आफ्रिकेमधून येणाऱ्या सर्व प्रवाशांची चाचणी करून, त्यांनी विलगीकरणात ठेवण्याची सूचना ‘ईयू’चे अध्यक्षपद असलेल्या स्लोव्हेनियाने सर्व सदस्य देशांना केली आहे. कोरोनाच्या या नव्या प्रकाराच्या धोक्याविषयी निश्‍चित माहिती मिळेपर्यंत द. आफ्रिकेमधील विमान सेवा थांबविण्याचे आवाहन युरोपिय महासंघ आयोगाच्या अध्यक्षा उर्सुला व्हॉन डर लिएन यांनी यावेळी केली आहे.

7. कॅनडा : मागील 14 दिवसामध्ये दक्षिण आफ्रिकेमधून प्रवास केलेल्या परदेशी नागरिकांना कॅनडाने काल प्रवेश बंदी जाहीर केले आहे. या काळात आफ्रिकेमध्ये जाऊन आलेल्या कॅनडाच्या नागरिकांना चाचणी अनिवार्य करण्यात आली आहे. कॅनडात परतल्यानंतर त्यांची कोरोना चाचणी करण्यात येणार आहे. त्याचा निकाल निगेटिव्ह येईपर्यंत त्यांना विलगीकरणामध्ये राहावे लागणार आहे.

ग्रीक वर्णमालेनुसार ओमीक्रोन हे अक्षर 15 व्या क्रमाकांवर आहे. जगात काही ठिकाणी कोरोनाचे अनेक प्रकार दिसून आले आहेत. सार्स- सीओव्ही-2 चा ‘बी.1.1.529’ हा 15 वा प्रकार आहे. यामुळे ‘डब्लूएचओ’ WHO ने त्याला ‘ओमीक्रोन’ नाव देण्यात आले आहे. ‘सार्स-सीओव्ही-2’च्या मुख्य प्रकाराकरिता उच्चारण्यास सहज, सोपे आणि लक्षात राहणारी ग्रीक वर्णमालेतील नावे आरोग्य संघटनेने 31 मे रोजी जाहीर करण्यात आली होती.

Edited By- Digambar jadhav

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: शेतकरी अप्पर तहसील कार्यालयावर चढले, सरकारच्या विरोधात घोषणाबाजी

वयानं मोठ्या तरूणीवर जीव जडला; १७ वर्षीय मुलानं वडिलांना सुसाईड नोट पाठवून आयुष्य संपवलं

MHADA: घराचं स्वप्न होईल पूर्ण; पुणे म्हाडानं सोडत अर्जाची मुदत वाढवली, काय आहे कारण ?

Maharashtra Politics: ठाकरे बंधूंना भाजपचा दे धक्का; दोन्ही पक्षांना पाडलं भलं मोठं खिंडार, ६००जणांचा पक्षप्रवेश

Loan Waiver : शेतकऱ्यांना कर्जमाफी करणार का? कडूंच्या आंदोलनावर मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले...

SCROLL FOR NEXT