Corona In India Saam Tv
देश विदेश

Corona In India: देशात मे सारखा कोरोना विस्फोट? 10 दिवसांत रुग्णांच्या संख्येत 6 पटीने वाढ!

देशात कोरोनाचा कहर वाढत आहे. गेल्या 24 तासांत 2.47 लाख नवीन रुग्ण आढळले आहेत, जे मंगळवारच्या तुलनेत 27 टक्क्यांनी जास्त आहे.

वृत्तसंस्था

नवी दिल्ली : ओमिक्रॉनमुळे देशात कोरोनाची तिसरी लाट वेगाने वाढत चालली आहे. गेल्या 24 तासांत देशात 2.47 लाखांहून अधिक नवीन रुग्ण आढळून आले आहेत. तर, हा आकडा मंगळवारपेक्षा 27% जास्त आहे. ओमिक्रॉनची (Omicron) प्रकरणे देखील 5,588 ने वाढली आहेत.

10 दिवसांत रोजच्या संख्येत 6 पट वाढ झाली आहेत, यावरून लक्षात येते की, देशात कोरोनामुळे परिस्थिती किती वेगाने बिघडत आहे. 3 जानेवारी रोजी देशात 37,379 नवीन प्रकरणे नोंदवली गेली आणि 12 जानेवारी रोजी 2.47 लाख प्रकरणे नोंदवली गेली आहेत. (Corona In India)

कोरोनाच्या (Corona) नवीन प्रकरणांव्यतिरिक्त, सक्रिय प्रकरणे (Active Cases) देखील वेगाने वाढू लागली आहेत. आता देशात उपचार घेत असलेल्या रुग्णांची संख्या 11 लाखांच्या पुढे गेली आहे. 3 जानेवारीपासून सक्रिय प्रकरणांमध्ये 6.5 पट वाढ झाली आहे. (Latest Corona Cases Update In India)

गेल्या 24 तासांत देशात 481 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. म्हणजेच दर तासाला 20 लोकांचा मृत्यू झाला आहे. 10 दिवसांत देशात 2,966 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. म्हणजेच दररोज सरासरी 296 लोकांना कोरोनामुळे आपला जीव गमवावा लागतो. त्यामुळे आत्तापर्यंत, देशात आतापर्यंत 4.84 लाख रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

हे देखील पहा-

कोरोनाचा कहर मे महिण्यासारखा!

आता पुन्हा देशात तशीच परिस्थिती निर्माण होत आहे, जी दुसऱ्या लाटेत होती. कोरोनाचा कहर मे महिन्यासारखा झाला आहे. गेल्या वेळी 26 मे रोजी 2 लाखांहून अधिक नवीन रुग्ण आढळले होते. त्या दिवशी 2.08 लाख नवीन प्रकरणे नोंदवली गेली होती. 26 मे नंतर 12 जानेवारीला 2 लाखांहून अधिक नवीन प्रकरणे समोर आली आहेत. दुसऱ्या लाटेचा पिक (Peak Point) 4.14 लाख होता. मात्र, काल समोर आलेली नवीन प्रकरणे दुसऱ्या लाटेच्या पीक पॉईंट पेक्षा 40 टक्के कमी आहेत. (Corona Peak In India)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana: लाडकीच्या खात्यात ₹१५०० जमा, फक्त याच महिलांना मिळणार जानेवारीचा हप्ता, कारण काय?

Hoil Skin Care: रंग पंचमीला चेहऱ्यावरील कलर तसाच राहण्याची भीती वाटते? मग रंग खेळण्याआधी करा हे स्किन केअर

Fatty Liver: फॅटी लिव्हर आणि इन्सुलिन रेजिस्टेंसला नियंत्रणात कसं ठेवाल? जीवनशैलीत करा हे ३ बदल

Idli Chutney Recipe: इडलीसोबत खातात ती खोबऱ्याची चटणी कशी बनवायची?

Air Ambulance Crash : एअर अ‍ॅम्ब्युलन्स क्रॅश, रूग्णासह ७ जणांचा मृत्यू; कुठे घडली दुर्घटना?

SCROLL FOR NEXT