BJP vs INDIA 
देश विदेश

BJP vs INDIA: पंतप्रधानांनी सरन्यायाधीशांच्या घरी गणरायाची पूजा केल्याने पेटला वाद; भाजप- इंडिया आघडीत जुंपली

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

पंतप्रधान नरेंद्र मोदी बुधवारी सीजेआय डीवाय चंद्रचूड यांच्या घरी पोहोचले. यावेळी त्यांनी सरन्यायाधीशांच्या घरी उपस्थित गणेशाची पूजा केली. पीएम मोदींनी इन्स्टाग्रामवर एक फोटोदेखील पोस्ट केला. यात ते सरन्यायाधीशांसोबत गणरायाची पूजा करताना दिसत आहेत. मात्र पंतप्रधान मोदी सरन्यायाधीशांच्या घरी पोहोचणे विरोधकांना आवडत नाही. विरोधकांनी याचा संबंध महाराष्ट्राच्या निवडणुकीशी जोडलाय. विरोधीपक्षाच्या टीकेला उत्तर देतांना भाजपकडूनही सडेतोड उत्तर देण्यात आले आहे.

पंतप्रधान मोदींनी काल केलेल्या पुजेमुळे अनेकांच्या झोप उडाल्या आहेत. तर भाजप प्रवक्ते संबित पात्रा यांनी काँग्रेसच्या टीकेला उत्तर देतांना म्हटलं की, इफ्तार पार्टीमध्ये पंतप्रधान आणि सरन्यायाधीश जाऊ शकतात तर गणपती बाप्पाची पूजा करण्यात वाईट काय असा सवाल त्यांनी टीकेला उत्तर देतांना दिलाय.

संबित पात्रा पुढे म्हणाले की, राहुल गांधी यांनी कोणीतरी विचारलं की, इंडिया आघाडी मधील ए चा अर्थ काय तर बराच वेळ विचार केल्यानंतर राहुल गांधींनी ए चा अर्थ लक्षात आलं आणि ए म्हणजे आघाडी असल्याचं म्हटलं. लगेच उत्तर देण्याआधी त्यांनी काही क्षण विचार केला होता कारण ते असमजदार आहेत. तसेच एचा अर्थ तुष्टीकरण, अपराध, किंवा अंहकार असावा असं त्यांना वाटत असावं त्यामुळे ते थांबले असावेत. 'ए' साठी अपराध बंगालमध्ये टीएमसीचा अपराध, ए साठी तुष्टीकरण,हिमाचल प्रदेशात काँग्रेस तुष्टीकरण करत आहे. तर ए म्हणजे काँग्रेस आणि त्यांच्या आघाडीमधील पक्षाचं असलेला अंहकार.

जे सरन्यायाधीश यांना राजकारणात ओढत आहेत. त्यांनी गणेशोत्सवाला राजकारण ओढलं हे अंहकार आहे. संबित पात्रा यांनी राहुल गांधी यांचे नाव न घेता त्यांच्यावर टीका केली. काल एका राजकारण्याने (राहुल गांधी) परदेशात जाऊन भारतविरोधी व्यक्तीची भेट घेतली. त्यावर काँग्रेसचा एकही नेता बोलला नाही. पंतप्रधान सरन्यायाधीशांना भेटायला गेले तर न्यायपालिका आणि कार्यपालिका यांच्यातील उत्तम समन्वयाचे कौतुक करण्याऐवजी आक्षेप घेतला गेल्याचं पात्रा म्हणालेत.

विरोधकांची टीका काय

ठाकरे गटाच्या नेत्या शिवसेना खासदार प्रियंका चतुर्वदी म्हणाल्या की,गणेशोत्सव संपल्यानंतर सरन्यायाधीश योग्य ते जाणून घेतील.महाराष्ट्रात संविधान अनुच्छेद १० चं उल्लंघन झालंय त्यावर सुनावणी करण्यास ते स्वतंत्र होतील. थोडं थांबवा तसेही निवडणुका जवळ आहेत. याला परत काही दिवसांसाठी स्थगित केलं जाईल.

त्यानंतर संजय राऊत यांनीही पंतप्रधान मोदींवर टीका केलीय. गणेशोत्सव सुरू आहे. या उत्सवात लोक एकमेकांच्या घरी जातात. पंतप्रधानांनी आतापर्यंत किती घरांना भेटी दिल्या आहेत,याची मला माहिती नाही. पण पंतप्रधानांनी सरन्यायाधीशांच्या घरी जाऊन आरती केली. संविधानाचे रक्षक राजकारण्यांना भेटले तर लोकांच्या मनात शंका निर्माण होऊ शकते. पुढे बोलतांना राऊत म्हणाले, महाराष्ट्रातील शिवसेना आमदार अपात्रेतेची सुनावणी सुरू आहे.

त्यात सरन्यायाधीश हे दुसऱ्या पक्षकारासोबत दिसत आहेत. दुसरे पक्षकार भाजप आहे,त्यात सरन्यायाधीश हे पंतप्रधानांसोबत दिसत आहेत. त्यामुळे ते संशयात येत आहेत.कारण त्यांचा संबंध दुसऱ्या पक्षकाराशी दिसत आहेत. प्रकरण स्पष्टपणे दिसत आहे.

अशा परिस्थितीत CJI चंद्रचूड आम्हाला न्याय देऊ शकतील का? आम्हाला तारीखेवर तारीख दिली जात आहे आणि असंविधानिक सरकार असेच चालू असल्याची टीका संजय राऊत यांनी केलीय. त्यावरही भाजपने जोरदार उत्तर दिलंय. काँग्रेसच्या केलेल्या टीकेवर भाजपचे प्रवक्ते शेहजाद पूनावाला यांनी उत्तर दिलंय. पुनावाला यांनी माजी पंतप्रधान मनमोहन सिंग आणि न्यायमूर्ती बाळकृष्ण यांच्या भेटीचा फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. त्यांनी लिहिले की, " २००९ मध्ये तत्कालीन सरन्यायाधीश केजी बाळकृष्ण यांनी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या इफ्तार पार्टीला हजेरी लावली होती.

दरम्यान १८ सप्टेंबर २००९ रोजी तत्कालीन पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या नवी दिल्लीतील निवासस्थानी इफ्तार पार्टीचे आयोजन करण्यात आले होते. तेव्हा तत्कालीन सरन्यायाधीश केजी बालकृष्ण यांनीही या कार्यक्रमात भाग घेतला होता.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

NPS Vatsalya Scheme: तुमच्या मुलांनाही मिळणार पेन्शन! महिन्याला गुंतवा हजार, मुलं होतील कोट्याधीश; जाणून घ्या काय आहे योजना

UPI स्कॅम कसा ओळखायचा? तुमचे पैसे सुरक्षित करण्यासाठी या टिप्स करा फॉलो

Mhada Lottery 2024: म्हाडा लॉटरी घरांसाठी शेवटच्या दिवशी 'पेमेंट फेल'चा फटका! घराचे स्वप्न पूर्ण होणार का? शेकडो अर्जदार चिंतेत

Employees Provident Fund: PF खातेधारकांसाठी मोठी बातमी; पीएफमधून काढता येणार १ लाख रुपये

Solapur News: धर्मराज काडादी यांनी विधानसभा लढवण्याची केली घोषणा, सोलापूरमधून उमेदवारीसाठी शिंदेंना घातलं साकडं?

SCROLL FOR NEXT