PM Narendra Modi News Saam tv
देश विदेश

PM Narendra Modi News : संसदेत मोदींवर हल्ल्याचा प्रयत्न? मोदींना काँग्रेस महिला खासदारांकडून धोका? VIDEO

PM Narendra Modi News : जनरल नरवणेंचं अप्रकाशित पुस्तकांवरून सुरु झालेला वाद मोदींच्या घातपाताच्या आरोपापर्यंत पोहोचलाय.... संसदेतच मोदींच्या घातपाताचा आरोप नेमका कुणी केलाय... आणि त्यावरुन संसदेत कसा राडा झालाय.. पाहूयात यावरचा स्पेशल रिपोर्ट...

Snehil Shivaji

राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर पंतप्रधान मोदी बुधवारी संसदेत निवदेन देणार होते मात्र लोकशाहीच्या मंदिरात मोदींवर हल्लाचा प्रयत्न झाला असा आरोप करुन भाजपच्या खासदारांनी देशाचं टेन्शन वाढवलं. भाजपच्या खासदारांनी नेमका काय दावा केला ऐका

महात्मा गांधींच्या अहिंसेच्या तत्त्वावर चालणाऱ्या काँग्रेसच्या महिला खासदारांवर मोदींवर हल्ल्याचा आरोप केल्यानं देशभरात खळबळ माजली. मात्र ज्या महिला खासदारांवर देशाच्या पंतप्रधानांवर हल्ल्याचा आरोप करण्यात आला त्यामध्ये महाराष्ट्रातील खासदार वर्षा गायकवाड देखील होत्या.. त्यांनी या आरोपांवर काय दिलयं ऐका,

घडल्या घटनेनंतर हातात बॅनर्स घेऊन कुणीही देशाच्या पंतप्रधानांवर हल्ला कसा करेल असा प्रश्न उपस्थित झालाय. जनरल नरवणेंचं अप्रकाशित पुस्तक आणि एपस्टिन फाईल सोबतच ट्रेड डीलवरुन काँग्रेसनं भाजपला संसदेत पुरेपुर घेरल्याचं दिसलं. यावेळी राहूल गांधींना भाषण करु न दिल्यानं काँग्रेसनं मोदी सरकारवर विरोधी पक्षाला बोलू न दिल्याचा आरोप केलाय. त्यामुळे या आरोपांना उत्तर देण्याऐवजी मोदींवर हल्ल्याचा कट म्हणून या प्रकरणांना कलाटणी देण्याचा हा भाजपचा प्रयत्न तर नाही ना अशी चर्चा या निमित्तानं सुरू झालीय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Kidney disease: किडनी खराब होण्याआधी शरीर देतं हे ५ धोकादायक इशारे; क्रिएटिनिन वाढण्याचं खरं कारण जाणून घ्या

Early cancer symptoms: तिसऱ्या आणि चौथ्या स्टेजमध्येच का होतं कॅन्सरचं निदान? डॉक्टरांनी सांगितलं यामागचं कारण

सकाळी नाश्त्याला प्या गरमा गरम गाजर-मशरूम सूप; झटपट बनवा ही सोपी रेसिपी

Goa Fort : गोवा ट्रिपमध्ये करा इतिहासाची सफर, 'हा' भव्य किल्ला पाहायला विसरू नका?

Maharashtra News Live Update: राज्यात मुसळधार, पण बुलडाण्यात पावसाची दडी

SCROLL FOR NEXT